शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

'कर्म रावणासारखे आणि...', दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांकडून गुजरात सरकारच्या निर्णयाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 17:52 IST

Manish Sisodia : गुजरातच्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्वागत केले आहे. 

नवी दिल्ली : गुजरात सरकारने गुरूवारी विधानसभेत 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील सहावी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याची घोषणा केली. गुजरात सरकारच्या या निर्णयाचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्वागत करत गुजरातच्या मंत्र्यांवरच निशाणा साधला आहे. 

न्यूज एजन्सी एएनआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. "नक्कीच हे एक उत्तम पाऊल आहे, परंतु जे लोक याची घोषणा करत आहेत, त्यांनी आधी गीतेच्या मूल्यांचे पालन केले पाहिजे. त्यांचे कर्म रावणासारखे आहे आणि ते गीतेबद्दल बोलत आहेत", असे मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, गुजरातचे शिक्षणमंत्री जितू वघानी यांनी गुरुवारी विधानसभेत शिक्षण विभागासाठी अर्थसंकल्पीय वाटपाच्या चर्चेदरम्यान या निर्णयाची घोषणा केली. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेतील नैतिक मूल्ये आणि तत्त्वे समाविष्ट करण्याचा निर्णय केंद्राच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) धर्तीवर घेण्यात आला आहे.  NEP आधुनिक आणि प्राचीन संस्कृती, परंपरा आणि ज्ञान प्रणाली समाविष्ट करण्यासाठी वकिली करते, जेणेकरून विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अभिमान वाटेल, असे जितू वघानी म्हणाले होते. 

कर्नाटकच्या शालेय अभ्यासक्रमातही भगवद्गीता?दुसरीकडे, कर्नाटकच्या शालेय अभ्यासक्रमातही भगवद्गीतेचा समावेश केला जाऊ शकतो. यासंदर्भात राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी शुक्रवारी संकेत दिले. भगवद्गीता केवळ हिंदूंसाठी नाही, ती सर्वांसाठी आहे. तज्ज्ञांच्या मते, ते शाळेत शिकवलेच पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला ठरवावे लागेल की शाळेत नैतिक शिक्षण पुन्हा सुरू करायचे की नाही. तसेच, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती स्थापन करावी लागेल, जी नैतिक शिक्षणात कोणते विषय असावेत, याचा निर्णय घेईल. ज्याचा मुलांवर चांगला प्रभाव पडतो, ते शिकवायला सुरुवात केली जाऊ शकते, मग ती भगवद्गीता असो, रामायण असो किंवा महाभारत असो, असे बी.सी. नागेश म्हणाले. 

टॅग्स :delhiदिल्लीEducationशिक्षणGujaratगुजरात