शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

West Bengal Election Result 2021: जमीन हिलाने वाली जीत मुबारक दीदी, भारीच...; केजरिवालांकडून ममतांना खास अंदाजात शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 15:58 IST

ममता बॅनर्जी यांनी आठव्या फेरीत सुवेंदू अधिकारी यांचे लीड जवळपास निम्म्याने कमी केले. नंतर अल्पशा मतांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर आघाडी घेतली होती, नंतर थोड्या वेळाने त्यांनी जवळपास 2700 मतांनी आघाडी मिळविली आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगाल (West Bengal Assembly Election) मध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) विजयाकडे आगेकूच करताना दिसत आहेत. तृणमूल काँग्रेस (TMC) 205 जागांवर पुढे आहे. तर भाजप 83 जागांवर आघाडीवर आहे. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी बंगालमध्ये जल्लोशालाही सुरुवात केली आहे. यात ममतांवर शुभेच्छांचा वर्षावरही सुरू झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री सीएम अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जींना एका विशेष अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. (AAP leader Arvind kejriwal congratulate to mamamta banerjee for victory in trends in west bengal )

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत ममतांना शुभेच्छा दिल्या आहेत. अरविंद केजरीवाल म्हणाले हा जमीन हलवणारा विजय आहे. यासाठी शुभेच्छा. काय सामना केला. पश्चिम बंगालच्या लोकांनाही शुभेच्छा.

west bengal election result 2021: ममतांच्या विजयानं राहुल गांधींचं टेंशन वाढणार! आता सोनिया गांधी कोणती खेळी खेळणार?

ममता बॅनर्जी यांचे सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपने संपूर्ण तागदीनिशी बंगाल विधानसभा निवडणूक लढली होती. भाजपने येथे आपण 200 हून अधिक जागा जिंकू, असा दावा केला होता. मात्र, त्यांना दाव्याप्रमाणे यश मिळाले नाही.

पश्चिम बंगालच्या जनतेकडून 'दीदी ओ दीदी'चं उत्तर -पश्चिम बंगालच्या जनतेनं 'दीदी ओ दीदी'चं जबरदस्त उत्तर दिलंय असं म्हणत अखिलेश यांनी निशाणा साधला आहे. तसेच ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पश्चिम बंगालमध्ये भाजप द्वेषाचे राजकारण पराभूत करणारी जागरूक जनता, आक्रमकपणे लढा देण्याऱ्या ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा. भाजपने एका महिलेवर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेचे जनतेने दिलेले उत्तर आहे. 'दीदी ओ दीदी'ला चोख प्रत्युत्तर दिले आहे" असे अखिलेश यांनी म्हटले आहे.

West Bengal Election Result 2021 : त्यामुळे एकट्या ममता बॅनर्जी बलाढ्य मोदी-शाहांना पडल्या भारी, ही आहेत पाच कारणे

ममता पुन्हा आघाडीवर - ममता बॅनर्जी यांनी आठव्या फेरीत सुवेंदू अधिकारी यांचे लीड जवळपास निम्म्याने कमी केले. नंतर अल्पशा मतांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर आघाडी घेतली होती, नंतर थोड्या वेळाने त्यांनी जवळपास 2700 मतांनी आघाडी मिळविली आहे. आता ममता ही आघाडी टिकवतात की सुवेंदू पुन्हा बाजी मारतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Mamata Banerjeeममता बॅनर्जीArvind Kejriwalअरविंद केजरीवालwest bengalपश्चिम बंगाल