शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:47 IST

Manjinder Singh Sirsa And AAP : दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी आपवर गंभीर आरोप केला आहे.

देशाची राजधानी दिल्लीप्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात यश येताना दिसत नाही. परिस्थिती इतकी बिकट आहे की, एअर क्वालिटी इंडेक्स ७०० च्या पार पोहोचला आहे. दिल्ली सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत, परंतु त्यांचा अद्याप कोणताही ठोस परिणाम दिसून आलेला नाही. यावरुन राजकारण तापलं आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी आपवर गंभीर आरोप केला आहे.

मंत्री सिरसा यांनी आरोप केला आहे की, आम आदमी पार्टी दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळत आहे. त्रिलोकपुरी विधानसभा मतदारसंघात 'आप'चे नगरसेवक विजय कुमार यांनी स्वतः कचरा पेटवून त्याचा व्हिडीओ बनवल्याचा दावा त्यांनी केला. "आप गलिच्छ राजकारण करत आहे. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना रोखावं" असं म्हणत सिरसा यांनी हल्लाबोल केला आहे.

"जाणीवपूर्वक कचरा जाळताहेत"

दिल्ली भाजपाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत 'आप'वर निशाणा साधला आहे. "खोटं पसरवण्यासाठी 'आप'चे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. प्रदूषण वाढवून दिल्ली सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांचे नगरसेवक जाणीवपूर्वक कचरा जाळत आहेत. सौरभ भारद्वाज यांनी 'ब्लेम गेम' खेळण्यापूर्वी थोडा अभ्यास केला असता, तर ज्या ठिकाणावरून ते ओरडत आहेत, तिथे त्यांचाच नगरसेवक असल्याचं त्यांना समजलं असतं" अशी टीका भाजपाने केली आहे.

दिल्लीत प्रदूषणाची चार मुख्य कारणं

पर्यावरण मंत्री सिरसा यांनी आगामी काळातील आव्हानांबाबत माहिती देताना सांगितलं की, "मागील आकडेवारी पाहता येणारा आठवडा दिल्लीसाठी कठीण असेल. मात्र, आम्ही सातत्याने काम करत आहोत. दिल्लीत प्रदूषणाची चार मुख्य कारणं आहेत, ती म्हणजे वाहनांमुळे होणारं प्रदूषण, धुळीमुळे होणारं प्रदूषण, घनकचऱ्यामुळे होणारं प्रदूषण आणि औद्योगिक प्रदूषण. सरकारने ६२ 'हॉटस्पॉट' निश्चित केले असून तिथे वेगाने काम सुरू आहे. प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी गुगल मॅप्स आणि 'मॅप इंडिया'ची मदत घेतली जाणार आहे असंही सिरसा यांनी म्हटलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : AAP Burning Garbage to Increase Delhi Pollution, Alleges Environment Minister

Web Summary : Delhi's pollution crisis deepens as the Environment Minister accuses AAP of deliberately burning garbage. AAP Councillor allegedly filmed igniting waste. BJP supports the claim. The government is mapping hotspots and working to control pollution from vehicles, dust, garbage, and industry.
टॅग्स :delhiदिल्लीpollutionप्रदूषणAAPआपBJPभाजपाPoliticsराजकारण