शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

AAP in Punjab: भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल यांची गळाभेट, चेहऱ्यावर दिसला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 16:34 IST

AAP in Punjab:पंजाबचे भावी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपचे राष्ट्रीय संजोयक अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत भेट घेतली.

नवी दिल्ली: काल म्हणजेच 10 मार्च रोजी देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. या पाचपैकी चार राज्यात भाजपची सत्ता आली, तर पंजाबमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पक्ष (AAP) सत्तेत आला. दरम्यान, कालच्या निकालानंतर आता आज आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Maan) यांनी दिल्लीत आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची भेट घेतली.

एएनआय या वृत्तसंस्थेने या नेत्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. व्हिडिओमध्ये भगवंत मान सुरुवातीला अरविंद केजरीवाल यांच्या पाया पडतात आणि नंतर दोन्ही नेते एकमेकांना घट्ट मिठी मारुन आनंद व्यक्त करताना दिसतात. केजरीवालांनातर मान मनीष सिसोदिया यांचेही आशीर्वाद घेऊन त्यांना मिठी मारतात. या भेटीदरम्यान सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता.

'आप'ची राष्ट्रीय राजकारणात मोठी छापकाल निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मुख्यालयात जनतेची आभार मानले. तसेच, राष्ट्रीय राजकारणात येण्याचे संकेतही दिले. दिल्लीतून सुरू झालेला इन्कलाब हा आता पंजाबमध्ये पोहोचला आहे. आता हा इन्कलाब देशभरात पोहोचेल, असे सांगत अरविंद केजरीवाल यांनी सर्वांना आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे.

'सर्वांनी आपमध्ये प्रवेश करावा'पंजाबच्या लोकांनी कमाल केली, लव्ह यू पंजाब. पंजाबमध्ये जे निकाल लागले आहेत, तो एक मोठा इन्कलाब आहे. पंजाबमध्ये मोठमोठ्या खुर्च्या हलल्या आहेत. बादल, कॅप्टन, चन्नी, सिद्धू असे दिग्गज पराभूत झाले, ही मोठी क्रांती आहे. आधी दिल्लीत इन्कलाब झाला, आता पंजाबमध्ये इन्कलाब झाला. हा इन्कलाब देशभरात पसरेल. सर्व महिला, तरुण, शेतकरी, मजूर, उद्योगपती यांन आता आम आदमी पक्षात प्रवेश करावा. सर्वांनी आपली ताकद ओळखा, आता देशभरात इन्कलाब आणायचा आहे, असे आवाहन केजरीवाल यांनी म्हटले आहे.

आपचा मोठा विजयAAP ने पंजाब विधानसभा निवडणुकीत 92 जागांवर विजय मिळवून 117 सदस्यांच्या विधानसभेत तीन चतुर्थांश बहुमतासह राज्यात आपले सरकार स्थापन केले. काँग्रेसला 18 जागा मिळाल्या तर भारतीय जनता पक्षाला दोन जागा मिळाल्या. शिरोमणी अकाली दलाला (एसएडी) तीन जागा मिळाल्या, तर बहुजन समाज पक्षाला केवळ एक जागा जिंकता आली. 

टॅग्स :Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBhagwant Mannभगवंत मान