निवडणुका लढण्यासाठी ‘आप’ कडे पैसाच नाही
By Admin | Updated: November 11, 2014 02:23 IST2014-11-11T02:23:06+5:302014-11-11T02:23:06+5:30
दिल्लीत जानेवारी-फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्याने राजकीय युद्ध रंगायला सुरुवात झाली आहे.

निवडणुका लढण्यासाठी ‘आप’ कडे पैसाच नाही
हरीश गुप्ता - नवी दिल्ली
दिल्लीत जानेवारी-फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्याने राजकीय युद्ध रंगायला सुरुवात झाली आहे. सध्या लोकप्रियता घटल्याने व देणग्यांचा ओघ कमी झाल्याने आम आदमी पार्टीसमोर अडचणी वाढल्या आहेत.
दिल्लीत डिसेंबर 2क्13 मधील विधानसभा निवडणुकीत आपने काँग्रेसचा पराभव करतानाच भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखले होते. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पैसा उभा करण्याची चिंता सतावू लागली आहे कारण पुढील वर्षाच्या प्रारंभी होणा:या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे लागणार आहे. आपला गेल्या एप्रिलमध्ये 12.52 कोटींची देणगी मिळाली होती. या ऑक्टोबरमध्ये 465 दात्यांनी केवळ 7.55 लाखांची देणगी दिल्याने आपचा पायाही डगमगू लागला आहे. गेल्या दहा महिन्यांत या पक्षाला किमान एक लाख लोकांनी 34.35 कोटी रुपयांची देणगी दिली असली तरी मे मध्ये दिल्लीत मोदींचे सरकार येताच आपला मिळणारा पाठिंबा व पैशाचा ओघही झपाटय़ाने आटू लागला आहे.
आपकडे येणारा पैशाचा ओघ असाच कमी होत राहिल्यास आम्हाला दिल्लीत रॅली आयोजित करणो किंवा आर्थिक पाठबळ मिळवणो कठीण जाईल, अशी कबुली देतानाच निवडणुका घोषित होताच पक्ष पुन्हा मोठी उडी घेऊ शकेल, असा विश्वास आपच्या एका नेत्याने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर व्यक्त केला.