शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

केजरीवाल यांचा दावा, “भगवंत मान यांच्यासह मंत्र्यांना माफियांकडून लाच देण्याचा प्रयत्न”; काँग्रेस म्हणाली नावं सांगा…

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 20:00 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल (AAP National Convener Arvind Kejriwal) यांनी काही गंभीर दावे केले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल (AAP National Convener Arvind Kejriwal) यांनी काही गंभीर दावे केले आहेत. पंजाबमध्ये आपचं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक बड्या माफियांनी त्यांच्याशी संपर्क साधल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann), मंत्री, पक्षाचे आमदार आणि नेत्यांना त्यांनी लाच देण्याबाबत सांगितल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला. त्यानंतर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमिरिंदर सिंग राजा वाडिंग (Punjab Congress President Amarinder Singh Raja Vading) यांनी केजरीवाल यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसंच त्या माफियांची नावं सांगण्याचीही मागणी केली आहे.

वाडिंग यांनी केजरीवाल आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांना ज्यांनी लाच देण्याचे प्रयत्न केले त्या माफियांच्या नावाचा पर्दाफाश करण्याची मागणी केली आहे. तसंच हे गंभीर प्रकरण असल्याचं सांगत मान आणि केजरीवाल यांनी यावर उत्तर द्यावं अशी मागणीही त्यांनी केली. “जेव्हा तुम्हाला माहित आहे की माफियांना कोण चालवतंय, तर तुम्ही त्यांची नावं सांगत का नाहीत,” असा सवालही वाडिंग यांनी केला. काय म्हणाले होते केजरीवाल?“पंजाबला लुटणारे सर्व मोठे माफिया माझ्याकडे येऊ लागले आहेत. ज्यांना लाच देऊन संपर्क साधता येईल अशी तुमच्या पक्षात कोणती व्यवस्था आहे का असं ते मुख्यमंत्री मान, आमचे मंत्री, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी यांना विचारत आहे. आम्ही त्या सर्वांना प्रामाणिकपणे काम करण्यास सांगितलं आहे. तसंच ही बाब न मानल्यास तुरुंगात टाकण्यात येईल असा इशाराही दिला आहे,” असं केजरीवाल यांनी सांगितलं होतं.

आश्वासन पूर्णआम्ही निवडणुकीपूर्वी पंजाबला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे आणि पैशाची कमतरता राज्याच्या प्रगतीच्या मध्ये येऊ दिली जाणार नसल्याचंही केजरीवाल म्हणाले. मान यांनी पंजाबमधील प्रत्येक घरात मोफत ३०० युनिट वीज देण्याची घोषणा केली होती तेव्हा केजरीवाल यांनी हे वक्तव्य केलं.

टॅग्स :PunjabपंजाबArvind Kejriwalअरविंद केजरीवालBhagwant Mannभगवंत मानdelhiदिल्ली