शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच गोव्यात आपचे दोन्ही उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 11:39 IST

लोकसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. पण आम आदमी पक्षाने त्या घोषणेपूर्वीच गोव्यातील एकूण दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार नुकतेच जाहीर करून टाकले आहेत.

पणजी : लोकसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. पण आम आदमी पक्षाने त्या घोषणेपूर्वीच गोव्यातील एकूण दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार नुकतेच जाहीर करून टाकले आहेत. भाजपा आणि काँग्रेसच्या विरोधात आम आदमी पक्ष लढणार आहे. त्यासाठी उत्तर गोव्यात प्रदीप पाडगावकर तर दक्षिण गोव्यात एल्वीस गोम्स असे दोन उमेदवार पक्षाने अधिकृतरित्या जाहीर केले. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात ख्रिस्ती मतदारांची संख्या ब-यापैकी आहे. विशेषत: सासष्टी आणि मुरगाव या दोन तालुक्यांमध्ये दहा ते अकरा विधानसभा मतदारसंघ असून तिथे ख्रिस्ती मतदारांची संख्या ही खूप आहे. मुरगाव तालुक्यापेक्षा सासष्टीत तर जास्तच आहे. सांगे, केपे, काणकोण, फोंडा अशा तालुक्यांमध्येही ख्रिस्ती मतदार आहेत पण त्यापेक्षा तिथे हिंदू मतदार खूप जास्त आहेत. दक्षिण गोव्यात अनुसूचित जमातींमधीलही (एसटी) मतदारांची संख्या बरीच आहे. त्यात ख्रिस्ती आणि हिंदू एसटींचा समावेश होतो. या सगळ्य़ाचा विचार करून आपने एल्वीस गोम्स यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. गोम्स हे गोवा सरकारच्या सेवेतून स्वेच्छा  निवृत्ती घेऊन बाहेर आले व मग ते आम आदमी पक्षाचे निमंत्रक बनले. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी गोम्स यांचे नाते एकदम चांगले आहे. गोम्स हा स्वच्छ चेहरा म्हणून ओळखला जातो.

2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही आम आदमी पक्षाने निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच बरेच उमेदवार जाहीर केले होते. त्यावेळी बाणावली, म्हापसा, पणजी व अन्य काही मतदारसंघांमध्ये आपला ब-यापैकी मते मिळाली होती. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात पाडगावकर यांना प्रथमच तिकीट जाहीर केले गेले आहे. पाडगावकर हे आपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. तेही स्वच्छ प्रतिमेचे असून ते आपचे सक्रिय पदाधिकारी आहेत. गोव्यात मतदारांची एकूण संख्या अकरा लाखांपेक्षा जास्त झालेली आहे. यापैकी बरेच मतदार हे भाजपा, काँग्रेस, मगोप, गोवा फॉरवर्ड अशा पक्षांमध्ये विभागले गेले आहेत. आपचेही समर्थक गोव्यात आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी आम आदमी पक्षाने गोव्यात आपली सगळी शक्ती वापरण्याचे ठरवले आहे.  

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल