शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"आपने तिकिटासाठी मागितले 50 लाख रुपये, अरविंद केजरीवालांना पुरावा देईन" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 15:56 IST

Punjab Election 2022 : आशु बांगर हे आता आप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत आणि देहाटमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत.

चंदीगड : आम आदमी पार्टी (AAP) रामराम ठोकून आशु बांगर (Ashu Bangar) हे काँग्रेसमध्ये (Congress) दाखल झाले आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपवर गंभीर आरोप केले आहेत. आपचे तिकीट मिळवण्यासाठी मला 50 लाख रुपये मोजावे लागले होते. त्यानंतरही माझ्यावर पैसे देण्यासाठी दबाव आणला जात होता, त्यामुळे पक्ष सोडला, असे गुरुवारी फिरोजपूरमध्ये आशु बांगर यांनी सांगितले. तसेच, आपमध्ये होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्येचा विचार केला होता, असे आशु बांगर यांनी म्हटले आहे.

फिरोजपूर देहाटमधून आपचे उमेदवार राहिलेले आशु बांगर, जे आता आप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत आणि देहाटमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. ते म्हणाले की, जेव्हा त्यांना पदभार द्यायचा होता, तेव्हा रात्री मोगाचे प्रभारी नवदीप सिंग संघा यांचा फोन आला की, उद्या तुमचा ब्रेक फास्ट मोगा येथे आहे, तुम्हाला एका मोठ्या व्यक्तिमत्वाला भेटायचे आहे. त्यानंतर मोगाला गेलो असता नवदीप सिंग संघा आणि हरपाल सिंग चीमा बसले होते. त्यांनी सांगितले, तुम्हाला तिकीट मिळणार नाही. जर तिकीट हवे असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील.

'केजरीवालांनी ऐकले नाही'मी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदर केजरीवाल यांना सर्व पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच ऐकले गेले नाही. दिल्लीतील ज्येष्ठ नेते पैसे घेऊन तिकीट वाटप करत आहेत, मात्र, केजरीवाल म्हणतात की, कोणीतरी पैसे देऊन आपकडून तिकीट घेतल्याचा पुरावा दाखवा. पण, मी तिकिटासाठी पैसे घेतल्याचे पुरावे देतो, असे आशू बांगर म्हणाले. तसेच,  फिरोजपूरचे प्रभारी असल्यापासून तिकिट देण्यापर्यंत पन्नास लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत, याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा आशु बांगर यांनी केला आहे.

पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला निवडणूकपंजाब विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात, प्रत्येक पक्ष आता पूर्ण जल्लोषात मतदारांना आपापल्या बाजूने आकर्षित करण्यात व्यस्त आहे. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला निवडणुका होत आहेत. आम आदमी पार्टीने भागवत मान यांना पंजाबमध्ये पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री चेहरा म्हणून घोषित केले आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्याशिवाय सुनील जाखरा यांच्याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. पंजाब सरकारचे अनेक मंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनाच मुख्यमंत्र्याचा चेहरा सांगत असले तरी. त्याचवेळी नवज्योतसिंग सिद्धू यांनीही अनेकदा आपल्या वक्तव्याने मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होण्याचे संकेत दिले आहेत. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२AAPआपcongressकाँग्रेस