आमिरने घेतली पंतप्रधानांची भेट

By Admin | Updated: June 23, 2014 15:22 IST2014-06-23T15:07:34+5:302014-06-23T15:22:44+5:30

मि.पर्फेक्शनिस्ट अशी ओळख असणा-या अभिनेता आमिर खानने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली

Aamir's meeting with the Prime Minister | आमिरने घेतली पंतप्रधानांची भेट

आमिरने घेतली पंतप्रधानांची भेट

>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २३ - मि.पर्फेक्शनिस्ट अशी ओळख असणा-या अभिनेता आमिर खानने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आमिर व मोदींची ही पहिलीच भेट आहे. ही भेट कशासाठी होती, या भेटीदरम्यान दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले, याबाबत माहिती समजू शकलेली नाही. मात्र सरदार सरोवर धरणाच्या वाढीला मेधा पाटकरांसोबतच आमिरनेही ही विरोध केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती, आमिर मात्र शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकला नव्हता.

Web Title: Aamir's meeting with the Prime Minister