आमीर खानच्या वक्तव्यावरुन पती-पत्नीत वाद, पत्नीने केली आत्महत्या
By Admin | Updated: November 26, 2015 16:17 IST2015-11-26T16:17:44+5:302015-11-26T16:17:44+5:30
बॉलीवूड अभिनेता आमीर खानने देशातील कथित असहिष्णूतेवर केलेल्या वक्तव्यावरुन येथील एका पती-पत्नीत वाद झाला आणि यावरुन पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली.

आमीर खानच्या वक्तव्यावरुन पती-पत्नीत वाद, पत्नीने केली आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
जबलपूर, दि. २६ - बॉलीवूड अभिनेता आमीर खानने देशातील कथित असहिष्णूतेवर केलेल्या वक्तव्यावरुन येथील एका पती-पत्नीत वाद झाला आणि यावरुन पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली.
सोनम पांडे असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव असून ती अभिनेता आमीर खानची मोठी चाहती होती. वर्तमान पत्रात छापून आलेल्या आमीर खानच्या असहिष्णूतेच्या मुद्यावरुन सोनम आणि तिचा पती मयांक पांडे याच्यांत चर्चा सुरु झाली. यावेळी मयांक मजेत सोनमला म्हणाला की, आमीर खान कसला पती आहे, जो आपल्या पत्नीने ऐकून परदेशात जायला निघाला. यावर सोनम काहीच न बोलता आपल्या खोली गेली आणि काही वेळानंतर ओरडल्याचा आवाज आला. सोनमचा आवाज ऐकल्यानंतर मयांक खोलीत गेला असता सोनमने विष प्राशन केले होते. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिला डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याचे मयांकचे वडील आर. पी . पांडे यांनी पोलिसांना सांगितले.
दरम्यान, याप्रकरणी सगळांचे जबाज नोंदवून घेतले असून सोनमचे शव पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक प्रफुल्ल श्रीवास्तव यांनी सांगितले.