चार राज्यांत फिरणार आम आदमीचा ‘झाडू’

By Admin | Updated: February 16, 2015 04:04 IST2015-02-16T04:04:51+5:302015-02-16T04:04:51+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील शानदार विजयानंतर आम आदमी पार्टी (आप) येत्या पाच वर्षांत चार राज्यांत आपले पाय रोवण्याच्या तयारीत आहे़

Aam Aadmi's 'broom' will revive in four states | चार राज्यांत फिरणार आम आदमीचा ‘झाडू’

चार राज्यांत फिरणार आम आदमीचा ‘झाडू’

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील शानदार विजयानंतर आम आदमी पार्टी (आप) येत्या पाच वर्षांत चार राज्यांत आपले पाय रोवण्याच्या तयारीत आहे़ मात्र यादरम्यान कुठल्याही प्रादेशिक पक्षासोबत तडजोड करण्यास ‘आप’ने नकार दिला आहे़ शिवाय ही चार राज्ये कोणती, हेही ‘आप’ने गुलदस्त्यात ठेवले आहे़
पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विचारवंत योगेंद्र यादव यांनी रविवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबतचे संकेत दिले़ एक सैद्धांतिक शक्ती म्हणून ‘आप’ देशाच्या राजकारणात स्थान निर्माण करू इच्छिते आणि यासाठी दीर्घकालीन लक्ष्य निर्धारित करण्याच्या योजनेवर आप काम करीत आहे़ आमचा पक्ष प्रादेशिक पक्ष नाही़ आम्ही एक दीर्घकालीन राष्ट्रीय पर्याय बनू इच्छितो़ म्हणूनच आम्ही जाणीवपूर्वक दिल्लीची निवड केली़ येत्या तीन ते पाच वर्षांत आम्ही दिल्ली आणि पंजाबशिवाय अनेक राज्यांत आपल्यारूपात एक सक्षम पर्याय उभा करू इच्छितो, असे यादव या वेळी म्हणाले़

Web Title: Aam Aadmi's 'broom' will revive in four states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.