शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

UP Election 2022: 'आप' आता यूपीतील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार; केजरीवालांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 14:10 IST

Aam Aadmi Party will fight Uttar Pradesh elections in 2022: उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी यासंदर्भात त्यांनी घोषणा केली. उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत.

जनआंदोलनच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षांपूर्वी पार्टीची स्थापना करण्यात आली होती. तीन वेळा दिल्लीत सरकार स्थापन करण्यास पार्टीला यश मिळाले. याशिवाय, पंजाबमध्ये आपल्या पार्टीने मुख्य विरोधी पक्षाचीही भूमिका बजावली आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशमध्ये अनेक पक्षांचे सरकार आले आणि सर्वांनी आपले घर भरण्याचे काम केले. यातच, उत्तर प्रदेशातून बरेच लोक आले, त्यांनी असे सांगितले की, आम आदमी पार्टीने राज्यात विधानसभा निवडणुका लढवाव्यात, असे अरविंद केजरीवाल म्हणाले, तसेच, उत्तर प्रदेशातील लोकांना प्रत्येक कामासाठी दिल्लीत का यावं लागलं? कानपूरच्या मुलांना चांगल्या कॉलेजसाठी दिल्लीत का यावं लागलं? भारतातील सर्वात मोठे राज्य सर्वात मोठे विकसित राज्य का होऊ शकले नाही? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. 

महिलांवरील अत्याचार थांबत का नाहीत?उत्तर प्रदेशात सर्व पक्षांचे सरकार स्थापन झाले आहे. अशा परिस्थितीत तेथील जनता आता आम आदमी पार्टीवर विश्वास ठेवेल. उत्तर प्रदेशात मोहल्ला क्लिनिक का तयार होत नाही? आपण चांगली कॉलेज का तयार करू शकत नाही? असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, भाजपावर निशाना साधत महिलांवर होणारे अत्याचार अखेर का थांबत नाहीत? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला.

तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यास यशआम आदमी पार्टीने दिल्ली शिवाय पंजाब, गोवा आणि हरयाणा विधानसभेच्या काही जागांवर निवडणूक लढविली आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार आहे, तर पंजाबमध्येही पार्टीला चांगले यश मिळाले आहे. चांगले शिक्षण, आरोग्य आणि मोफत वीज-पाण्याच्या फॉर्म्युल्यामुळे 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत  आम आदमी पार्टीने 70 पैकी 62 जागा जिंकून दिल्लीत तिसर्‍यांदा सरकार स्थापन करण्यात यश मिळविले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकPoliticsराजकारण