शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

“...अन्यथा काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू, ऐक्याला सुरुंग लागतोय”; आप आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 14:42 IST

Delhi Assembly Election: काँग्रेसच्या उमेदवारांचा निवडणूक खर्च भाजपाकडून होत असल्याचा मोठा दावा आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे.

Delhi Assembly Election: आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्षाचे नेते काँग्रेस आणि भाजपावर टीका करताना दिसत आहेत. यातच आता काँग्रेसमुळेइंडिया आघाडीच्या ऐक्याला सुरुंग लागत असून, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने भाजपाशी हातमिळवणी केल्याचा आरोप आप पक्षाने केला आहे.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी काँग्रेस आणि भाजपावर निशाणा साधला आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला फायदा व्हावा यासाठी काँग्रेस त्यांना मदत करत आहे. अजय माकन भाजपाची स्क्रिप्ट वाचत असतात, ते भाजपाच्या इशाऱ्यावर विधाने करतात आणि भाजपाच्या सूचनेनुसार आप नेत्यांना लक्ष्य करतात. काल त्यांनी सर्व मर्यादा ओलांडत आमचे नेते अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हटले, अशी टीका संजय सिंह यानी केली.

...अन्यथा काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू

त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अजय माकन यांच्यावर काँग्रेसने २४ तासांच्या आत कारवाई करावी अन्यथा आम्ही इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी संपर्क साधू आणि काँग्रेसला आघाडीतून काढून टाकण्याची मागणी करू, असे संजय सिंह यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेस अरविंद केजरीवाल यांच्यावर देशद्रोही असल्याचा आरोप करत आहे. काँग्रेसने माझ्या आणि अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेसने भाजपाच्या कोणत्याही नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे का? काँग्रेसच्या उमेदवारांचा निवडणूक खर्च भाजपाकडून होत असल्याचे आम्हाला सूत्रांकडून समजले आहे. भाजपा काँग्रेसच्या उमेदवारांना निधी देत ​​आहे, असा मोठा दावा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी केला आहे. 

दरम्यान, फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. सलग १५ वर्षे दिल्लीत सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने ६२ जागा तर भाजपाने ८ जागा जिंकल्या होत्या. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAam Admi partyआम आदमी पार्टीAAPआपcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी