आम आदमी पक्षाचे नेता सोमनाथ भारती यांना अटक

By Admin | Updated: September 22, 2016 12:45 IST2016-09-22T12:45:33+5:302016-09-22T12:45:33+5:30

आम आदमी पक्षाचे नेता सोमनाथ भारती यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे . 'एम्स' च्या सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याबाबत त्यांच्याविरोधात एफआयआर

Aam Aadmi Party leader Somnath Bharti was arrested | आम आदमी पक्षाचे नेता सोमनाथ भारती यांना अटक

आम आदमी पक्षाचे नेता सोमनाथ भारती यांना अटक

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.22- आम आदमी पक्षाचे नेता सोमनाथ भारती यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे . 'एम्स' च्या सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याबाबत त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. अखेर आज दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली. 
 
9 सप्टेंबरला सोमनाथ भारती आणि त्यांच्या समर्थकांनी 'एम्स'च्या सुरक्षारक्षकांना मारहाण केली अशी एफआयआर दाखल करण्यात आली होती.  'एम्स' चे  मुख्य सुरक्षारक्षक आरएस रावत यांनी भारतींविरोधात हौज खास पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. 
 
सोमनाथ भारती यांनी स्वतः देखील ट्विटरवर अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. गौतम नगरमध्ये झालेल्या वादामुळे मी हौज खास पोलीस स्टेशनमध्ये आहे असं ट्वीट त्यांनी केलं.   

Web Title: Aam Aadmi Party leader Somnath Bharti was arrested