शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"सनी देओलसारख्या मोठ्या लोकांना मतदान करू नका कारण...", केजरीवाल यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 16:47 IST

सनी देओल आपल्या लोकसभा मतदारसंघात येत नसल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.

Arvind Kejriwal on Sunny Deol : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंजाब येथे अभिनेता सनी देओलच्या मतदारसंघात जाऊन त्याचा खरपोस समाचार घेतला. केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी बॉलिवूड अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओलवर देखील निशाणा साधला. सनी देओल त्याच्या लोकसभा मतदारसंघात येतही नसल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये बोलत होते.

अरविंद केजरीवाल यांनी जनतेला संबोधताना म्हटले, "मागील लोकसभा निवडणुकीत तुम्ही लोकांनी सनी देओलला निवडून पाठवले होते. पण तो कधी आला, कधी त्याचा चेहरा पाहिला का? कधीच आला नाही. तो एक चांगला अभिनेता आहे असे आपल्याला वाटायचे. तो चांगले काम करेल, त्यामुळे मत दिले. पण ही मोठी लोक काहीच करणार नाहीत." गुरुदासपूरमध्ये १८५४ कोटी रुपयांच्या विकास योजनांचा शुभारंभ करताना केजरीवाल विरोधकांवर बरसले. 

सनी देओलवर टीकास्त्र "सामान्य लोकांना मतदान करा, ते तुमच्यासाठी काम करतील. जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा तुमचा फोन उचलला जाईल. घरी जेव्हा गरज असेल तेव्हा घरीही येतील. दुसऱ्या पक्षाच्या फंदात पडू नका. मागील दीड वर्षात आम्ही जे काम केले आहे, त्याच्या आधारावर मतदान करा. सनी देओलने ज्या प्रकारे धोका दिला आहे, यावेळी मात्र अशी फसवणूक करून घेऊ नका", अशा शब्दांत त्यांनी देओलवर टीकास्त्र सोडले. 

दरम्यान, 'विकास क्रांती रॅली'मध्ये बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, गुरुदासपूरमध्ये चांगल्या दर्जाच्या सरकारी शाळा बांधल्या जात आहेत. आम्ही राजकारणात पैसा कमावण्यासाठी किंवा सत्ता भोगण्यासाठी आलो नाही, जनतेची सेवा करण्यासाठी आलो आहोत. पूर्वीचे सरकार म्हणायचे की तिजोरी रिकामी आहे. गुरुदासपूर ही वीरांची भूमी आहे. शहीदांच्या कुटुंबीयांना आम्ही आर्थिक मदत म्हणून एक कोटी रुपये देतो.

टॅग्स :PunjabपंजाबArvind Kejriwalअरविंद केजरीवालSunny Deolसनी देओलAam Admi partyआम आदमी पार्टी