विमानतळाच्या खासगीकरणाविरोधात एएआयच्या शेकडो कार्यकर्त्यांची निदर्शने

By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:49+5:302015-02-11T23:19:49+5:30

चेन्नई : देशातील सुमारे १२४ विमानतळांचे खासगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला असतानाच, याविरोधात विरोधाचे स्वर तीव्र झाले आहेत़ भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या(एएआय) शेकडो कर्मचाऱ्यांनी आज बुधवारी एकजूट दाखवत, विमानतळ खासगीकरणाविरोधात निदर्शने केली़

AAI's hundreds of demonstrators protest against airport privatization | विमानतळाच्या खासगीकरणाविरोधात एएआयच्या शेकडो कार्यकर्त्यांची निदर्शने

विमानतळाच्या खासगीकरणाविरोधात एएआयच्या शेकडो कार्यकर्त्यांची निदर्शने

न्नई : देशातील सुमारे १२४ विमानतळांचे खासगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला असतानाच, याविरोधात विरोधाचे स्वर तीव्र झाले आहेत़ भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या(एएआय) शेकडो कर्मचाऱ्यांनी आज बुधवारी एकजूट दाखवत, विमानतळ खासगीकरणाविरोधात निदर्शने केली़
तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत राय आणि केंद्रीय अध्यक्ष एस़आऱ संतानम यांच्या नेतृत्वाखाली एएआयचे ५०० पेक्षा अधिक कर्मचारी चेन्नई विमानतळावर एकत्र आले़ त्यांनी सरकारविरोधात जोरदार नारेबाजी केली़
विमानतळांचे खासगीकरण हा केंद्राचा धोरणात्मक निर्णय असून विमानतळांना जागतिक मापदंडानुसार बनविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे अलीकडे नागरी उड्डयन मंत्रालयाने मद्रास उच्च न्यायालयासमक्ष सांगितले होते़

Web Title: AAI's hundreds of demonstrators protest against airport privatization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.