‘आधार’ सक्तीचा आज होणार फैसला; पाच न्यायाधीशांचे घटनापीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:40 IST2017-12-15T00:40:29+5:302017-12-15T00:40:41+5:30
बँकेत खाते उघडणे, मोबाईलचे सीमकार्ड घेणे यासह विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी ‘आधार’ कार्डची सक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयास स्थगिती द्यायची की नाही, याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठ उद्या शुक्रवारी देणार आहे.

‘आधार’ सक्तीचा आज होणार फैसला; पाच न्यायाधीशांचे घटनापीठ
नवी दिल्ली : बँकेत खाते उघडणे, मोबाईलचे सीमकार्ड घेणे यासह विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी ‘आधार’ कार्डची सक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयास स्थगिती द्यायची की नाही, याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठ उद्या शुक्रवारी देणार आहे.
‘आधार’ सक्तीस आव्हान देणा-या याचिकांवर सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठापुढे गुरुवारी प्राथमिक सुनावणी झाली.