शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

१७५ काेटी वेळा झाले ‘आधार’ व्हेरिफिकेशन; ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही लाभ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 08:03 IST

८,४२६ कोटी ऑक्टोबरअखेरपर्यंत पडताळणी व्यवहार आधारच्या १२ अंकी डिजिटल आयडीचा उपयोग करून केले.

नवी दिल्ली : देशात आधार कार्डच्या वापरात जबरदस्त वाढ होताना दिसत आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये आधार कार्डद्वारे १७५.४४ कोटी पडताळणी व्यवहार (ऑथेन्टिकेशन ट्रॅन्झॅक्शन) झाले. यातील बहुतांश पडताळणी व्यवहार बोटांच्या ठशांद्वारे पूर्ण करण्यात आले आहेत. त्याखालोखाल डेमोग्राफिक व ओटीपी आधारित पडताळणीचा प्रक्रियेचा वापर करण्यात आला. आधार कार्ड भारताच्या ‘डिजिटल इंडिया’ पुढाकारात महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसत आहे.

८,४२६ कोटी ऑक्टोबरअखेरपर्यंत पडताळणी व्यवहार आधारच्या १२ अंकी डिजिटल आयडीचा उपयोग करून केले. यात हयात प्रमाणपत्र, ई-केवायसी, दूरवर्ती क्षेत्रातील बँकिंग व्यवहार आणि आधाराधिष्ठित डीबीटी अथवा पडताळणी यांचा समावेश आहे. 

फेस सर्टिफिकेशनमध्ये जबरदस्त वाढफेस सर्टिफिकेशनद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या सप्टेंबर २०२२ मध्ये ४.६७ लाख होती. ऑक्टोबरमध्ये हा आकडा तब्बल ३७ लाखांवर गेला. फेस सर्टिफिकेशनद्वारे निवृत्तिवेतनधारकांस सामान्य सेवा केंद्रांवर न जाताच आपल्या मोबाईल फोनचा वापर करून घरूनच डिजिटल हयात प्रमाणपत्र बनविण्याची सुविधा मिळते. 

ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही लाभ आधारचा उपयोग करून २३.५६ कोटी ई-केवाईसी व्यवहार ऑक्टोबरमध्ये झाले. ऑक्टोबर २०२२ पर्यंत ई-केवायसीची एकूण संख्या १,३२१.४९ कोटी झाली आहे. आधारद्वारे होणाऱ्या ई-केवायसीमुळे बँकिंग व बिगर-बँकिंग वित्तीय सेवा अधिक पारदर्शक तसेच अधिक सुलभ झाल्या आहेत. ग्राहक आणि व्यापारी अशा दोघांनाही त्याचा लाभ होत आहे. आधारधारकाच्या संमतीनंतरच ई-केवायसी केले जाते. यात कागदोपत्री कारवाई पूर्णत: समाप्त झाली आहे.

२३.६४ कोटी एईपीएस आधारित व्यवहार ‘आधार सक्षम देय प्रणालीला’ही (एईपीएस) ऑक्टोबरमध्ये गती मिळाली आहे. आधारच्या माध्यमातून दुर्बल घटक श्रेणीतील नागरिक १,१०० पेक्षा अधिक शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत. ऑक्टोबरमध्ये २३.६४ कोटी एईपीएस आधारित व्यवहार झाले. सप्टेंबरच्या तुलनेत हा आकडा १२.४ टक्के अधिक आहे. ऑक्टोबर २०२२ च्या अखेरपर्यंत एईपीएस आणि मायक्रो-एटीएम नेटवर्कच्या माध्यमातून दूरवर्ती भागात १,५७३.४८ कोटी बँकिंग व्यवहार करण्यात आले आहेत.