शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा प्रस्ताव नाही, केंद्र सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 20:14 IST

 केंद्र सरकारने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा दिशेने पावले उचलली आहेत. मात्र मातमत्तांच्या खरेदी विक्री व्यवहारांसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्याचा...

नवी दिल्ली -  केंद्र सरकारने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा दिशेने पावले उचलली आहेत. मात्र मातमत्तांच्या खरेदी विक्री व्यवहारांसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्रीस शहरी विकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मंगळवारी लोकसभेत दिलेल्या एका लेखी उत्तरातून ही माहिती दिली आहे. ग्रामविकास मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मालमत्ता खरेदीसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र अशाप्रकारचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे त्यांनी या उत्तरात म्हटले आहे. 1908 च्या नोंदणी कायद्यातील तरतुदींनुसार संपत्तीच्या खरेदीसाठी आधारकार्ड अनिवार्य केले गेले पाहिजे, असा सल्ला केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी दिला होता. आधार कार्ड हे बँक खात्यांसोबत जोडण्याबरोबरच प्रॉपर्टी बाजारासाठीही अनिवार्य करण्यात येऊ शकते, असे म्हटले होते. त्यामुळे शहरी विकास राज्यमंत्र्यांनी आज दिलेली माहिती महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शहरी ग्रामविकास राज्यमंत्री म्हणाले,"सध्यातरी मालमत्ता व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही." सरकारने मालमत्ता खरेदीला आधार कार्डशी जोडण्यासाठी कोणते धोरण आखले बनवली आहे आणि ते लागू करण्याची मुदत काय आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निनावी मालत्तांना लक्ष्य करण्याचा इरादा व्यक्त केला होता. त्यानंतर आधार कार्डसोबत मालमत्ता खरेदी जोडण्याचा प्रस्ताव असल्याचे वृत्त आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.

दरम्यान,  सर्वोच्च न्यायालयाने बँक खाते आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च करण्याचा आदेश काही दिवसांपूर्वी दिला होता. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणि लोककल्याणकारी स्कीमसाठीही ही नवी डेडलाइन देण्यात आली होती. याशिवाय मोबाइल आधारशी लिंक करण्यासाठी देण्यात आलेली डेडलाइनदेखील वाढवण्यात आली होती. याआधी 6 फेब्रुवारी ही डेडलाइन देण्यात आली होती, जी वाढवून 31 मार्च करण्यात आली होती. 

नुकतेच, सर्वोच्च न्यायालयाने बँक खातं आधारशी लिंक करण्याची अखेरची तारीख रद्द केली होती. अखेरची तारीख रद्द करण्याआधी बँक खातं आधारशी लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2017 ही डेडलाइन होती. आता ही तारीख वाढवण्यात आली असून 31 मार्च 2018 करण्यात आली आहे. सरकारने सरकारी योजनेअंतर्गत योजनांचा फायदा घ्यायचा असल्यास आधार कार्ड बँक खात्यांशी जोडणं अनिवार्य केलं आहे. नवीन बँक खातं उघडणा-यांनाही सर्वोच्च नयायालयाने दिलासा दिला आहे. नवीन बँक खातं उघडणारे आधार कार्डशिवाय खातं उघडू शकतात, पण त्यांना आधारसाठी अर्ज केल्याचा पुरावा सादर करावा लागेल असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. याआधी नवीन बँक खातं उघडण्यासाठी आधार कार्ड सादर करणं अनिवार्य होतं. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डGovernmentसरकार