आबा श्रद्धांजली.....
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:03+5:302015-02-20T01:10:03+5:30
आर.आर. पाटील यांना श्रद्धांजली

आबा श्रद्धांजली.....
आ .आर. पाटील यांना श्रद्धांजलीकोदामेंढी : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर. पाटील उपाख्य आबासाहेब यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अरोली ग्रामपंचायत भवन येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सदानंद निमकर होते. यावेळी जि.प. सदस्य शकुंतला हटवार, सरपंच नंदू धानकुटे, सुनील आरंभी, दामोदर देशमुख, नत्थू नान्हे, सदानंद कुंभलकर, हरिचंद्र समरीत, कैलास समरीत, राहुल पानतावणे, गजेंद्र खोडके, नाना गजबे, नरेश बोरकर, शिल्पा आडगुळकर, सीमा मेहर, निर्मला मडावी, सामदेव समरीत, हेड कॉन्स्टेबल रमाकांत अवस्थी, महेश नोरिया, गजानन राठोड, शरद येळकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. मौदामौदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीतर्फे आबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्थानिक चक्रधर स्वामी मंदिरात आयोजित शोकसभेत कार्यकर्त्यांनी आबा पाटील यांच्याप्रति आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. दिवंगत आबासाहेबांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण केले. यावेळी शिवराज गुजर, पृथ्वीराज गुजर, उपसभापती राजेश ठवकर, विलास धनजोडे, राजेश धनजोडे, राजेश सोनकुसरे, पंकज पौनीकर, आनंदराव माथनीकर, अशोक धनजोडे, प्रताप सरनाईक, रमेश फुलबांधे, शामराव थोटे, विजय पांडे आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.खापरखेडाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सावनेर विधानसभा अध्यक्ष अमर जैन यांच्या नेतृत्वात दिवंगत आर.आर. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी दिवाकर घेर होते. यावेळी अनेक सर्वपक्षीय मान्यवरांनी आबांच्या जीवन चरित्रावर विचार मांडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी जि.प. समाजकल्याण सभापती दीपक गेडाम, शांताराम गावंडे, रमेश जैन, रामू वसुले, हेमराजसिंह परिहार, मनोज डेव्हिड, पृथ्वीराज बागडे, भरत पटेल, धनराज डेहरिया, अशोक वंजाळ, राजू गभणे, कपिल वानखेडे, अमित मेश्राम, राधेश्याम फुलझेले, देवानंद मंगरे, जितेंद्र पानतावणे, आशिष जैन, सुधाकर ठाकरे, संजय सूर्यवंशी, नीलकमल वाघमारे, लीलाधर एकरे, लाला यादव, रमेश मधुमटके, शिवदास वासनिक, सुरेश वसुले, राजेंद्र जवादे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधींकडून)