आबा जोड२
By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST
सामान्यांचा आवाज हरपला - सुधीर पारवे
आबा जोड२
सामान्यांचा आवाज हरपला - सुधीर पारवेमाजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या निधनाने सामान्यांचा आवाज हरपला आहे. राजकीय क्षेत्रात जिल्हा परिषद सदस्य पदापासून तर गृहमंत्री म्हणून त्यांनी संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. मात्र नियतीने अचानक घाला घातला आणि सामान्यांसाठी लढणारा हा लढवय्या आज नियतीपुढे मात्र हरला. त्यांच्या निधनाने राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नुकसान झाले आहे. - सुधीर पारवे,आमदार, उमरेड. .......सर्वसामान्यांच्या नेत्याला गमावले - श्रावण परातेआबा एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांना राजकीय वारसा नव्हता. अशाही सर्वसामान्य परिस्थितीवर मात करीत उपमुख्यमंत्री, गृहमंत्रिपदाची धुरा त्यांनी यथोचितपणे सांभाळली. एवढ्या मोठ्या पदावर पोहचत त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. आजच्या दूषित राजकारणातून एक स्वच्छ प्रतिमेचा नेता गेल्याने राजकीय, सामाजिक हानी झाली आहे. - श्रावण पराते,माजी मंत्री.....महाराष्ट्राची हानी - राजीव पोतदारमाजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांचे निधन हे महाराष्ट्रासाठी धक्कादायक असून, राज्याने उमद्या आणि तडफदार नेत्याला गमावले. ग्रामीण भागातील प्रश्नांची, समस्यांची त्यांना जाण होती. छोट्या पदापासून मोठ्या पदापर्यंत त्यांनी न्यायपूर्ण आणि यशस्वी जबाबदारी सांभाळली. सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला आपण गमावले.- डॉ. राजीव पोतदार,जिल्हाध्यक्ष, भाजप.