शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणाच्या इंजिनिअर कॉलेजमध्ये प्रेम; पुण्यात लग्नाच्या बहाण्याने शोषण; हुंडाही घेतला अन् पलटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 13:59 IST

बिहारच्या सीतामढी येथे प्रेमप्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

Engineering College Love Story । नवी दिल्ली : बिहारच्या सीतामढी येथे एका प्रेमप्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला आहे. येथील एक तरूण आणि तरूणी हरयाणाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकायला गेले. तिथे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले असे सांगितले जात आहे. परंतु, सीतामढीमध्ये प्रेम, लैंगिक शोषण, फसवणूक प्रकरण समोर आल्यानंतर याचा भांडाफोड झाला आहे. हे प्रेमीयुगुल हरयाणाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. तिथून दोघेही 30 डिसेंबरला पुण्याला गेले. तेव्हापासून 3 फेब्रुवारीपर्यंत तरुणाने लग्नाच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर लग्नाच्या नावाखाली हुंड्यासाठी 4.35 लाख रुपये मागितले. मग टाळाटाळ करण्यासाठी संबंधित तरूण होळी साजरी करण्यासाठी सीतामढी येथे घरी पोहोचला आणि त्याने लग्नाला नकार दिला. आता या संपूर्ण प्रकरणात मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मदतीसाठी अर्ज केला आहे.

दरम्यान, सीतामढी पोलिसांनी सांगितले की, एफआयआरच्या प्रक्रियेनंतर उर्वरित तपास केला जाईल, सध्या ही प्रेमाच्या नावाखाली फसवणुकीची असल्याचे दिसते आहे. सीतामढी येथील एका तरुणाने आधी एका तरुणीवर प्रेमाचे नाटक केले आणि नंतर लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या घरच्यांकडून लग्नाच्या नावाखाली लाखो रुपये मागितले. पैसे घेतल्यानंतर तो होळीमध्ये घरी आला आणि तरुणीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने नकार दिला. याबाबत पीडितेने तिच्या कुटुंबीयांसह जिल्ह्यातील परिहार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याशिवाय लेखी अर्ज देखील दिला आहे.

बलात्काराच्या कलमांतर्गत खटल्यासाठी अर्जपीडित तरूणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोघेही हरयाणातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. येथूनच ते एकमेकांच्या संपर्कात आले. दोघे इतके जवळ आले की 30 डिसेंबर 2022 ला ते पुण्याला गेले. इथे त्या मुलाने त्याचा खरा चेहरा दाखवला. लग्नाच्या बहाण्याने 3 फेब्रुवारी 2023 पर्यंत सोबत ठेवले आणि यादरम्यान लैंगिक शोषण केले. मुलीने लग्न करायचे सांगितल्यावर त्याने मुलीच्या कुटुंबीयांकडून 4 लाख 35 हजार रुपयेही मागितले. यानंतर कॉलेजची परीक्षा देण्यासाठी हरयाणात आला. त्यानंतर होळीच्या बहाण्याने तो सीतामढी येथील परिहार या त्याच्या घरी आला आणि होळीनंतर लग्न करणार असल्याचे सांगितले. घरी आल्यानंतर मुलाने लग्नास नकार दिल्याने मुलीने बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :BiharबिहारPuneपुणेHaryanaहरयाणाsexual harassmentलैंगिक छळLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट