शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"मोदी जी चाय पकोडे", मोदींच्या भाषणाने प्रेरित होऊन युवकाने सुरू केला व्यवसाय, भावाला बनवले पोलीस अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 17:20 IST

बिहारमधील युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने प्रेरित होऊन स्वत:चा व्यवसाय उभारला आहे.

Inspiration From PM Narendra Modi Speech । गया : बिहारमधील गया जिल्ह्यातील युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने प्रेरित होऊन स्वत:चा व्यवसाय उभारला आहे. गया जिल्ह्यातील चेरकी शेरघाटी मुख्य रस्त्यावर 'मोदी जी चाय पकोडे' हे दुकान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आत्मनिर्भर' भाषणाने प्रेरित होऊन स्थानिक बलवीर चंद्रवंशी नावाच्या तरुणाने छोट्या हॉटेलचा व्यवसाय सुरू केला. सुरूवातीला त्याची आजूबाजूच्या लोकांनी खूप खिल्ली उडवली, पण आज या बलवीरचे सर्वजण कौतुक होत आहे. चहा पकोडे विकून बलवीरने आज त्याच्या भावाला पोलीस अधीक्षक बनवले आहे. याशिवाय त्याने परिसरातील तरूणांना रोजगार दिला आहे.

बलवीर चंद्रवंशीने सांगितले की, इंटरमिजिएटचे शिक्षण घेतल्यानंतर चार वर्षांपूर्वी तो रोजगाराच्या शोधात कोलकाता येथे गेला होता. तिथल्या एका खासगी कंपनीत काही दिवस काम करूनही चांगली नोकरी न मिळाल्याने तो घरी परतला. कुटुंब चालवण्यासाठी पुढे काय करायचे ही चिंता त्याला शांत बसू देत नव्हती. याच कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी दिलेली भाषणे ऐकून त्याला प्रेरणा मिळाली. त्यानंतर तो आपल्या गावी आला. गावातच चहा पकोड्यांचे दुकान उघडले ज्यातून आज भरपूर कमाई होत आहे.

स्थानिक लोकांमध्ये दुकानाची क्रेझदेशाचे पंतप्रधान मोदींच्या नावाने दुकान उघडले आणि शुध्द मोहरीच्या तेलात बनवलेले पकोडे बनवायला सुरूवात केली, जे इथे खूप प्रसिद्ध झाले आहेत. बलवीरने दुकानाच्या नावासोबत पंतप्रधान मोदींचा फोटो देखील लावला आहे. या रस्त्यावरून जाताना चहा आणि पकोड्यांचा शौकीन असणारा माणूस इथे नक्कीच थांबतो आणि याचा आस्वाद घेतो. या चहा पकोड्यांच्या दुकानातून आलेल्या पैशातून बलवीरने त्याच्या लहान भावाला शिकवून अधीक्षक बनवले असल्याचे बलवीरने सांगितले. याच वर्षी बलवीरचा लहान भाऊ जयंत कुमार याची पोलीस अधिकारी म्हणून निवड झाली आहे. खरं तर याचे संपूर्ण श्रेय जयंतने त्याचा मोठा भाऊ बलवीर चंद्रवंशी याला दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :BiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसायPoliceपोलिसInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी