शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पतीची हत्या करून हार्टॲटॅकचा रचला बनाव, २० दिवसांत उरकलं दुसरं लग्न, पण खुनी पत्नीचा असा फसला डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 18:02 IST

Karnataka Crime News: प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीनेच तिच्या प्रियकरासोबत मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील टुमकूर जिल्ह्यात घडली आहे.

प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीनेच तिच्या प्रियकरासोबत मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील टुमकूर जिल्ह्यात घडली आहे. या महिनेले तिच्या पतीची हत्या करून त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे भासवले. मात्र पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या २० दिवसांनंतरच तिने दुसरं लग्न केल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांचा संशय बळावला. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांचीही एंट्री झाली आणि तब्बल महिनाभरानंतर या खुनाच्या गुन्ह्याला वाचा फुटली. आता पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. तसेच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार तुमकूरमधील दसराहल्ली गावातील रहिवासी असलेल्या परमेश याचा ३० जानेवारी रोजी अचानक मृत्यू झाला. परमेश याचा हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याचे पत्नी आशा हिने कुटुंबीयांना सांगितले. अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना धक्का बसला होता. तसेच परमेश याच्यावर घाईघाईने अंत्यसंस्कारही  उरकण्यात आले. मात्र हा एका कटकारस्थानाचा भाग आहे, याची कुटुंबीयांना जाणीवही झाली नाही. पण परमेशच्या मृत्यूनंतर अवघ्या २० दिवसांनी त्याची पत्नी आशा हिने मित्र चंद्रप्पा याच्यासोबत लग्न केले, तेव्हा कुटुंबीयांना आणि ग्रामस्थानांही आश्चर्याचा धक्का बसला. गावात कुजबूज सुरू झाली. त्यातूनच परमेश याच्या बहिणींना संशय आला. तसेच त्यांनी या प्रकरणी हेब्बूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली.

आशा आणि चंद्रप्पामध्ये आधीपासून संबंध असल्याचा संशय कुटुंबीयांना होता. त्यात परमेशच्या लग्नानंतर दोघांनीही घाईगडबडीत लग्न उरकल्याने हा संशय अधिकच बळावला. त्याआधारावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तसेच पोलिसांनी परमेशचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. या जबाबांदरम्यान, आशा आणि चंद्रप्पा यांच्या जबाबामध्ये परस्परविरोध दिसून आला.

पोलिसांकडून सतत सुरू असलेल्या चौकशीमुळे अखेर आशा आणि चंद्रप्पा यांचा धीर सुटला. तसेच दोघांनीही परमेश याच्या हत्येचा कट रचल्याचे मान्य केले. त्यांनी सांगितले की, परमेस आमच्या वाटेतला सर्वात मोठा अडसर ठरला होता. त्यामुळेच त्याला कायमचं रस्त्यातून हटवण्याची योजना आम्ही आखली, अशी कबुली त्यांनी दिली. आशा आणि चंद्रप्पा यांनी दोघांनी मिळून परमेशची हत्या केली. त्यांनी परमेशचं तोंड उशीने दाबलं आणि त्याची हत्या केली. त्यानंतर कुणालाही संशय येऊ नये म्हणून हृदयविकाराचा झटका येऊन परमेशचा मृत्यू झाल्याचा दावा केला. तसेच कुटुंबातील शोकाचं वातावरण पाहून कुणाला संशय येऊ नये म्हणून झटपट अंत्यसंस्कारही उरकले. मात्र अखेरीस त्यांचं पितळ उघडं पडलं.   

English
हिंदी सारांश
Web Title : Wife Murders Husband, Fakes Heart Attack, Remarries Quickly, Gets Caught

Web Summary : A Karnataka woman murdered her husband with her lover, faking a heart attack. Suspicion arose after she remarried within 20 days. Police investigated, exhumed the body, and arrested the couple, who confessed to the crime.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटक