शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तृतीयपंथीयांकडे केली सेक्सची मागणी, नकार दिल्याने बेदम मारहाण करून कापले केस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 18:02 IST

तामिळनाडूतील तुतीकोरीनमधून एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : तामिळनाडूतील तुतीकोरीनमधून एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, इथे 2 आरोपी तृतीयपंथी व्यक्तींसोबत अतिशय वाईट वर्तन करत आहेत. हे दोघे या तृतीयपंथी लोकांना मारहाण आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये आणखी एक तृतीयपंथी व्यक्ती सुजलेल्या डोळ्यांनी जमिनीवर बसलेली दिसत आहे. खरं दोन जण निष्पाप तृतीयपंथी व्यक्तींना त्रास देत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे त्यांच्यापैकी एकाने तृतीयपंथी व्यक्तीचे जबरदस्तीने केस कापले. व्हिडीओ व्हायरल होताच या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.  

व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या आरोपींची ओळख पटली असून योवा बुबान आणि विजय अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना कालुगुमलाई पोलिसांनी अटक केली आहे. तुतिकोरिनचे पोलीस अधीक्षक बालाजी सरवना यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींवर आयपीसी कलम आणि ट्रान्सजेंडर पीपल्स राइट्स क्ट 2019 अंतर्गत छळ, शिवीगाळ, प्राणघातक हल्ला आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी दोन्ही आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

तृतीयपंथीयांकडे केली सेक्सची मागणीहा व्हायरल व्हिडीओ तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ग्रेसा बानू यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एक आरोपी म्हणतो की, जे इतरांकडून पैसे उकळतात त्यांचे काय करायचे? तर पीडितांनी आरोप केला आहे की, "या दोन तरुणांनी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले, आम्ही मात्र नकार दिल्याने आरोपीने आमच्यासोबत असे वर्तन केले." आरोपींनी या दोन तृतीयपंथीयांना शहरातून हाकलून देण्याची धमकी देखील दिली होती. ट्विटरवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून लोक या घटनेवर संताप व्यक्त करत आहेत. 

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारीTransgenderट्रान्सजेंडरPoliceपोलिस