शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कडक सॅल्युट! अग्निशमन दलाच्या जवानानं जिंकली मनं; जीवाची बाजी लावून आगीतून 'तिरंगा' काढला बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 15:48 IST

अग्निशमन दलातील जवानाच्या धाडसाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : देशाचा राष्ट्रध्वज हा अभिमान आणि शौर्याचे प्रतिक आहे. भारतीय जवान तिरंग्याच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र झटत असतात. तिरंग्यावर कोणतीही आपत्ती आली की देशवासीय त्यासाठी जीव धोक्यात घालायलाही तयार असतात. असाच काहीसा प्रकार हरयाणाच्या पानिपत जिल्ह्यात पाहायला मिळाला. खरं तर इथे अग्निशमन दलात तैनात असलेल्या भटनागर कॉलनी जींद येथील रहिवासी फायरमन सुनील मेहला या जवानाने आपल्या कृतीने सर्वांची मनं जिंकली. 

दरम्यान, शहरातील भारत नगर येथील सूतगिरणीला भीषण आग लागली होती. आगीने संपूर्ण परिसराला विळखा घातला होता. मात्र, इमारतीच्या वरच्या बाजूस तिरंगा डौलाने फडकत होता. हळूहळू आगीने रौद्ररूप धारण करत तिरंग्याकडे कूच केली. एवढ्यात अग्निशमन दलाच्या जवानाने धाडस दाखवून तिरंग्याचे रक्षण केले. 

जवानानं जिंकली मनं खरं तर जवानाने आपल्या जीवाची बाजी लावून आगीतून तिरंगा बाहेर काढला. आगीच्या वेळी मिलच्या मुख्य गेटच्या छतावर तिरंगा फडकत होता. तेवढ्यात जवान सुनील यांची नजर तिरंग्यावर पडताच त्याने जीव धोक्यात घालून तिरंग्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. काही वेळातच तिरंगा सुरक्षितपणे खाली उतरवून आदराने शेजारील कारखान्यात ठेवण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून नेटकरी या जवानाला सलाम ठोकत आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :HaryanaहरयाणाNational Flagराष्ट्रध्वजFire Brigadeअग्निशमन दल