शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेत अनोखा विवाह; 75 वर्षीय 'नवरदेवा'ला उचलून आणावं लागलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 17:55 IST

मुख्यमंत्री सामूहिक कन्या विवाह योजनेअंतर्गत एक अनोखा विवाह सोहळा पार पडला.

सतना : मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात मुख्यमंत्री सामूहिक कन्या विवाह योजनेअंतर्गत एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. इथे मुख्यमंत्री सामूहिक  कन्या विवाह योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ब्लॉकमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अशातच एक अनोखा विवाह सोहळा रामनगर जिल्ह्यात झाल्याचे पाहायला मिळाले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आझाद मैदानावर आयोजित सामूहिक विवाह परिषदेत एकूण 135 जोडपी विवाहबंधनात अडकली.

अनोख्या विवाहाची रंगली चर्चा या अनोख्या विवाहसोहळ्यास मध्य प्रदेश सरकारचे राज्यमंत्री रामखेलावन पटेल यांनी देखील हजेरी लावली होती. खरं तर इथे 65 वर्षीय मोहनियाबाई यांचा विवाह 75 वर्षीय भगवानदिन सिंग गोंड यांच्याशी झाला. हे दोघेही वृद्ध जवळपास 10 वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. लक्षणीय बाब म्हणजे वधू मोहनियाने लग्न केले नव्हते, तर भगवानदिन सिंग गोंड यांच्या पहिल्या पत्नीचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून ते दोघेही एकत्र राहत होते. वर भगवानदीन जन्मतः एका पायाने अपंग आहेत. त्यांना पहिल्या पत्नीपासून अपत्यही नाही. वयाच्या या नाजूक टप्प्यावर दोघेही एकमेकांच्या वृद्धावस्थेत आधार ठरतील अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, सामूहिक कन्या विवाह योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक जोडप्याला रोख रकमेसह घरगुती वस्तू पुरवत असते. एका जोडप्यावर 51 हजार रुपये खर्च करण्याची तरतूद आहे. या रकमेतून मंडप आणि जेवणाच्या बदल्यात 6,000 रुपये कापले जातात, तर 34,000 रुपयांच्या वस्तूंसह 11,000 रुपयांचा धनादेश दिला गेला. रामनगर जिल्ह्याचे कार्यकारी अधिकारी जोसुआ पीटर यांनी घरगुती वस्तूंच्या वितरणाची माहिती दिली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीmarriageलग्नViral Photosव्हायरल फोटोज्