शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब: तेलाने भरलेल्या टँकरचा भीषण अपघात; संपूर्ण परिसर आगीच्या कचाट्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 15:42 IST

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातानंतर तेलाने भरलेल्या टँकरला आग लागली अन् वाहतूक विस्कळीत झाली.

Ludhiana Oil Tanker Fire: पंजाबमधील लुधियाना येथे बुधवारी आगीचे तांडव पाहायला मिळाले. राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातानंतर तेलाने भरलेल्या टँकरला आग लागली अन् वाहतूक विस्कळीत झाली. हळू हळू या आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. लुधियाना-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर हा अपघात झाला. खन्ना येथील बसस्थानकाजवळ तेलाने भरलेल्या टँकरला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खन्ना लुधियाना या भागात तेलाचा टँकर दुभाजकाला धडकून उलटल्यानंतर भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की काही वेळातच ऑईल टँकरने पेट घेतला. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले.

मात्र, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत टँकर आगीने पूर्णपणे वेढला होता. महामार्गावरील आगीचे भयावह दृश्य व्हिडीओओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेत संपूर्ण उड्डाणपूल आगीच्या भक्ष्यस्थानी आला. आग लागल्यानंतर उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवीने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग कशी लागली याचा तपास सुरू आहे. मात्र, टँकर उलटल्यानंतर आग लागल्याचे प्रथमदर्शनी बोलले जात आहे.

टॅग्स :PunjabपंजाबAccidentअपघातfireआग