शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सापासोबत 'खेळ' करणं साधूला पडलं महागात; तडफडत झाला मृत्यू अन् लोक काढत राहिले VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 16:59 IST

उत्तर प्रदेशातील जालौनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील जालौनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साप पकडताना त्याच्याशी खेळ करणे एका साधूच्या चांगलच आंगलट आले. सापासोबत खेळ करत असताना सापाने साधूला चावा घेतला आणि तो बेशुद्ध झाला. मात्र, उपस्थित लोक साधूला मदत करायची सोडून व्हिडीओ काढत राहिले. संबंधित साधूची गंभीर स्थिती पाहून त्याला जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. साधूच्या मृत्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

खरं तर ही घटना कुथुंड पोलीस स्टेशन हद्दीतील नीम गावातील आहे. नीम गावात श्रीमद भागवत कथेच्या समारोपप्रसंगी भंडारा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी प्रसाद घेण्यासाठी हजेरी लावली होती. दरम्यान, कार्यक्रमास्थळी अचानक एक विषारी साप आला. हे पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि सर्वजण इतरत्र पळू लागले. याची माहिती मिळताच नवर गावातील रहिवासी साधू सीताराम हे प्रसाद घेण्यासाठी आले असता त्यांनी साप पाहिला. पण तेवढ्यात साप झुडपात लपला. त्यावर साधूने त्याला काठीने पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. साधूने काठीने सापाला पकडण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र, साप त्यांना पकडता आला नाही. यादरम्यान साधूने काठीने सापाला दाबले. अशातच सापाने साधूचा चावा घेतला, त्यामुळे ते जागीच खाली कोसळले. 

लोक व्हिडीओ काढत राहिले यादरम्यान साप पकडताना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी घाईघाईने घटनास्थळ गाठले आणि व्हिडीओ काढू लागले. मात्र, साधूला तात्काळ रुग्णालयात नेण्याऐवजी लोक त्यांचा व्हिडीओ काढत राहिले. साधू बराच वेळ जमिनीवर तडफडलेल्या अवस्थेत होते. त्यानंतर इतर काही ग्रामस्थ तिथे आल्यानंतर साधूला प्राथमिक आरोग्य केंद्र कुथुंड येथे दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार केले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूsnakeसाप