शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 19:09 IST

"यासंदर्भात मी बैठकीत ठरवेन, काय बोलायचे ते. आता तुम्हाला कशाला सांगू? काय बोलायचे, तो आमचा अधिकार आहे. तेवढं तरी आम्हाला ठरवू द्या..."

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाविजय मिळाल्यानंतर, आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात दिल्लीतमहायुतीतील काही प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, हेदेखील दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना मुख्यमंत्री पदासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किलपणे 'मी काही ज्योतिष नाही', असे उत्तर दिले.

काय म्हणाले अजित दादा? -अजित दादांना मुख्यमंत्री म्हणून बघायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणखी पाच वर्षे वाटावे लागेल का? असा प्रश्न विचारला असता, "मी काही ज्योतिषी नाही. यासंदर्भात आज रात्री आमची चर्चा होईल. आम्ही देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे आमचे लक्ष आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे चाललो आहोत, असे अजित पवार म्हणाले.

अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतले जाणार आहे का, असा काही फॉर्म्युला आहे का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, "अरे राज्याचे सरकार आहे. १३-१४ कोटी लोकांचे नेतृत्व करायचे आहे. आम्ही एका विचाराने पुढे चाललो आहोत. आमचे ध्येय राज्याचा सर्वांगीण विकास करणे आहे. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी मिळविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. याच बरोबर, पूर्वीच्या योजनां कशा व्यवस्थित चाललीत आणि आश्वासनांची पूर्तता कशी होईल? हे आमचे पहिले लक्ष आहे."

तुमच्या पक्षाला केंद्रात मंत्रीपद मिळेल का? असे विचारले असता, "यासंदर्भात मी बैठकीत ठरवेन, काय बोलायचे ते. आता तुम्हाला कशाला सांगू? काय बोलायचे, तो आमचा अधिकार आहे. तेवढं तरी आम्हाला ठरवू द्या," असे अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारdelhiदिल्लीMahayutiमहायुती