शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरावर तयार होत आहे प्रचारगीत; २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप या मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्षांना घेरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 08:02 IST

या मुद्द्यावरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना घेरण्याची रणनीती पक्षाकडून आखली जात आहे.

नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्येतील राम मंदिरास सर्वांत मोठा निवडणूक मुद्दा बनविण्याची जोरदार तयारी भाजपने केली आहे. या मुद्द्यावरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना घेरण्याची रणनीती पक्षाकडून आखली जात आहे.

उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार साहित्यात भाजपचा सर्व भर राममंदिरावरच राहणार आहे. राम मंदिराचे पोस्टर्स होर्डिंग्ज तयार केले जात आहेत. निवडणूक गीते आणि भजनांतही राममंदिरच मुख्य असेल. सर्व रणनीती या पद्धतीने आखली जात आहे की, काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना घेरता येऊ शकेल.  या मुद्द्यावर विरोधी पक्षांची ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था झाली आहे. दि. २२ जानेवारीच्या उद्घाटन सोहळ्यास जावे की नको, असा पेच विरोधी पक्षांसमोर निर्माण झाला आहे. 

निरहुआ व मनोज तिवारी यांच्या आवाजात राममंदिरावरील गाणी व भजने भाजपकडून आणली जात आहेत. पंतप्रधान मोदी यांची हॅट्ट्रिक व ४०० जागा जिंकण्याचा मनसुबा त्यात आहे. मुख्य पोस्टर व होर्डिंग्जवर मंदिराच्या स्थापनेच्या वेळी मोदी यांनी घातलेल्या साष्टांग दंडवताचा फोटो असेल.

१ जानेवारीपासून घरोघर अक्षतांचे वाटप - राममंदिराचा मुद्दा लोकांच्या मनात ठसविण्यासाठी दि. १ जानेवारीपासून भाजप, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते घरोघर जाऊन अयोध्येला येण्यासाठी अक्षता आणि निमंत्रण देतील. - देशातील प्रत्येक मंदिरात अक्षतांचे पूजन करून वाटप केले जाईल. - कोट्यवधी कार्यकर्ते त्यात सहभागी होतील. 

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपा