शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षे ताटकळत ठेवण्याचा नवा डाव; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 08:05 IST

महिला आरक्षणाचा मुद्दा आणखी सात ते आठ वर्षे ताटकळत ठेवण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

नवी दिल्ली : महिलांना आरक्षण देण्यास माझा पाठिंबा आहे. मात्र, त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने संसदेत मांडलेल्या विधेयकामध्ये अन्य मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षणाची तरतूद नाही. त्यामुळे हे विधेयक अपूर्ण आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. जातनिहाय जनगणना केंद्र सरकारने तत्काळ करावी, अशीही त्यांनी मागणी केली.

ते म्हणाले की, देशाच्या लोकसंख्येत मोठा हिस्सा असलेल्या महिलांना आरक्षणाचे फायदे मिळायला हवेत. मात्र या प्रकारच्या तरतुदी मोदी सरकारने सादर केलेल्या विधेयकात दिसत नाहीत. महिला आरक्षण तत्काळ लागू करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. महिला आरक्षणाचा मुद्दा आणखी सात ते आठ वर्षे ताटकळत ठेवण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

‘भाजप दरवेळी नवा इव्हेन्ट करतो’काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, केंद्रामध्ये ९० सचिव आहेत. त्यातील केवळ तीनजण ओबीसी समुदायातील असून ते देशाच्या अर्थसंकल्पातील केवळ पाच टक्के भाग नियंत्रित करतात. विरोधी पक्षांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली की भाजप एक नवा इव्हेन्ट करून या मुद्द्यापासून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे प्रयत्न सुरू करतो.

‘जनतेचे अधिकार काढून घेण्याच्या हालचाली’स्वातंत्र्यप्राप्तीपासून आतापर्यंत भारतामध्ये सतत सत्तेचे हस्तांतरण होत राहिले आहे. त्यामुळे भारतीय जनतेला अधिक अधिकार प्राप्त झाले. तर दुसऱ्या बाजूला जनतेचे अधिकार काढून घेण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांना थांबविण्यासाठी सध्या संघर्ष सुरू आहे, असेही काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

राष्ट्रपतींना निमंत्रण देणे आवश्यक होतेजुन्या संसद भवनातून कामकाज नव्या संसद भवनामध्ये हलविण्यात आले. इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे मोदी सरकारने राष्ट्रपतींना निमंत्रण देणे आवश्यक होते. मात्र, तसे घडले नाही. - राहुल गांधी 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा