शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 08:45 IST

ईशान्येकडील राज्यांत पावसाने उडाला हाहाकार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ईशान्येकडील राज्यांत पावसाने हाहाकार उडाला असून, अरुणाचल प्रदेशात पूर व भूस्खलनाने मरण पावलेल्यांची संख्या १० झाली आहे. असाममध्ये पुराची स्थिती गंभीर झाली आहे. मणिपूरमध्ये पुरामुळे १९,८११ लोक प्रभावित झाले आहेत व ३,३६५ घरांचे नुकसान झाले आहे.

आसाम : पूरस्थिती गंभीर

गुवाहाटी : आसाममध्ये पुराची स्थिती गंभीर झाली आहे. कछार व श्रीभूमी जिल्ह्यांत आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. १५ जिल्ह्यांत सुमारे ५ लाख लोक पुराने प्रभावित झाले आहेत. पूर व भूस्खलनाने मृत्युमुखी पडणारांची संख्या १२ झाली आहे. कछार जिल्ह्यात एक लाखाहून अधिक लोक पुराने प्रभावित झाले आहेत. 

अरुणाचल : पूर व भूस्खलनाने लोकांना मोठा फटका

इटानगर : अरुणाचल प्रदेशच्या लोहित जिल्ह्यात भूस्खलन व पुराने मरण पावलेल्यांची संख्या १० झाली आहे. सोमवारीही जोरदार पाऊस झाला. राज्यातील २३ जिल्ह्यांतील १५६ गावांत शेकडो लोक पुराने प्रभावित झाले आहेत. लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्यपालांनी केले आहे.राज्यातील कामेंग, कामले, लोअर व अप्पर सुबनसिगी, पापुम पारे, दिबांग घाटी, लोणर दिबांग घाटी, लोहित, चांगलांग, क्रा दादी, कुरुंग कुमेय व लोंगडिंग जिल्ह्यांत पुराची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे.  पूर्व कामेंग जिल्ह्यात भूस्खलनात दोन कुटुंबांना घेऊन जाणारे वाहन वाहून गेल्याने सात जणांचा मृत्यू झाला.

मणिपूर : पुराचे पाणी घरात

इम्फाळ : मणिपूरमध्ये नद्यांना पूर आले असून, यामुळे १९,८११ लोक प्रभावित झाले आहेत. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर येऊन ३,३६५ घरांचे नुकसान झाले. हेइगांग, वांगखेई व खुरई विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक हानी झाली आहे. राज्यात भूस्खलनाच्या ४७ घटना घडल्या आहेत.

केरळ : वीजपुरवठा बंद

तिरुवनंतपुरम : मुसळधार पाऊस व वेगवान वाऱ्यामुळे मूलभूत सोयीसुविधांचे नुकसान झाले आहे. वीज महामंडळाच्या २६,३३९ खंबांचे नुकसान झाले. यामुळे ग्राहकांचा वीजपुरवठा प्रभावित झाला. यात एकूण १६४.४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. अनेक जिल्ह्यांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

टॅग्स :RainपाऊसAssamआसामArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशKeralaकेरळ