शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: 3 मुलांच्या आईने केले दुर्लक्ष; वेड्या प्रियकराने जीवघेणा हल्ला केला अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 12:40 IST

प्रेयसीचा राग मनात धरून प्रियकराने तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.

नवी दिल्ली : प्रेयसीचा राग मनात धरून वेड्या प्रियकराने तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी तरुणाने महिलेच्या डोक्यावर पट्टीने अनेक वार केले आणि तिला रक्तबंबाळ करून तिथून पळ काढला. ही घटना उत्तराखंडमधील हरिद्वार येथील सिडकुल पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. खरं तर इथे कारखान्यात काम करणाऱ्या एका विवाहित महिलेचे त्याच कारखान्यात काम करणाऱ्या मृदुल नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. रात्री उशिरा मृदुल महिलेला भेटण्यासाठी आला असता दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला, या रागातूनच मृदुलने महिलेच्या डोक्यावर पट्टीने अनेक वार केले आणि तेथून पळ काढला.

महिला गंभीर जखमी घटनेची माहिती मिळताच कुल पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी गंभीर जखमी महिलेला उच्च केंद्रात पाठवले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. महिलेची प्रकृती चिंताजनक असून ती मृत्यूशी झुंज देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. महिलेची अवस्था पाहून पोलिसांनी एसडीएम सदर यांना दंडाधिकार्‍यांसमोर तिचे म्हणणे नोंदवण्यास सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि आरोपी तरूण दोघेही उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघेही मागील अनेक वर्षांपासून सिडकुल पोलीस ठाणे हद्दीतील हेतमपूर येथे वेगवेगळ्या घरात भाड्याने राहत होते. महिला विवाहित असून तिला तीन मुले आहेत. या घटनेतील आरोपी मृदुल आणि संबधित महिला रेणू यांची वारंवार भेट होत होती. फोन न उचलल्याने मृदुलला महिलेचा खूप राग आला आणि नंतर भेटीत दोघांमध्ये बाचाबाची झाली. मृदुलचा राग इतका वाढला की तिने रेणूच्या डोक्यात रॉडने अनेक वार केले, त्यामुळे ती रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडली आणि आरोपीने तिथून पळ काढला. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक