शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पतीने दाखवला राक्षसी अवतार! अन् आजारी मुलाला वाचवण्यासाठी सुरू झाला 'माऊली'चा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 20:08 IST

आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या मातेची कहाणी सर्वांनाचा भावूक करणारी आहे.

मिर्झापूर : आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या मातेची कहाणी सर्वांनाचा भावूक करणारी आहे. या माऊलीने व्याजावर पैसे घेतले, दागिने विकले. मात्र एवढं करूनही उपचारासाठी आणखी पैसे लागतील म्हणून शेवटी तिने घरही गहाण ठेवले. शेवटी या मातेने आपल्या आजारी मुलासाठी आतोनात प्रयत्न करणे सुरूच ठेवले. मात्र, आजारपणाने त्रस्त असलेल्या मुलाला त्याच्या वडिलांनी गंगेत फेकून मारण्याचा प्रयत्न केला. पण, आईने मुलाच्या उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, त्यामुळे आता तो हळूहळू बरा होत आहे. या आईच्या चेहऱ्यावर हसू परत येत आहे.

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील लालगंज तालुक्यातील उस्का गावातील सुमन या माऊलीला मुलगा झाला तेव्हा घरात आनंदाला थारा नव्हता. मुलाचे नाव शौर्य असे ठेवण्यात आले. शौर्य यांच्या हसण्या-खेळण्यामुळे त्यांच्या छोट्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. शौर्यचा जन्म त्याच्या आई-वडिलांसाठी आशीर्वादच होता. पण लवकरच त्यांचा चार महिन्यांचा मुलगा शौर्य आजारी पडल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले. पण त्याच्या आईने खचून न जाता 'शौर्य' दाखवले. 

शौर्यच्या आईने सांगितली आपबीती शौर्यची आई सुमन यांनी सांगितले की, शौर्य आजारी पडल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी जिकडे सांगितले तिथे मुलाला दाखवले. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. तेव्हा लोक म्हणाले की, भूतांचा त्रास आहे, त्यामुळे मुलगा आजारी राहतोय आणि औषधही काम करत नाही. त्यामुळेच सुमन यांनी त्यांच्या काळजाच्या तुकड्याला बाजूच्या बाबांकडे नेले. त्यांनी 15 हजार रुपये घेतले, पण मुलाला आराम पडला नाही. त्यानंतर त्यांनी मिर्झापूरपासून बनारसपर्यंत अनेक खासगी रुग्णालयांना भेटी दिल्या, पण शौर्य कुठेही बरा झाला नाही. यादरम्यान उपचारासाठी चार लाखांहून अधिक रुपये खर्च झाले. 

शौर्यच्या वडिलांचा राक्षसी अवतार शौर्यच्या आईने सांगितले की, डॉक्टरांनी सांगितले की त्याला टीबी झाला आहे. सहा महिने औषध घेतले. पण, आराम मिळत नव्हता. त्यानंतर त्याला दुसऱ्या ठिकाणी दाखवले असता डॉक्टरांनी सांगितले की, त्याची पचनसंस्था बिघडली आहे, त्याला आता वाचवता येणार नाही. निराश होऊन आम्ही मुलाला घेऊन घरी आलो. तेव्हा कोणत्याही प्रकारची आशा नव्हती. दरम्यान, अंगणवाडीतील एक शिक्षिका आली आणि त्यांनी सर्कल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाण्यास सांगितले. शौर्यबरोबर आम्ही तिथे गेलो. त्याची अवस्था बघून त्याच्या वडिलांचे कंबरडे मोडले. तो जगणार नाही, गंगेत फेकून घरी परत जा, असे त्यांनी मला सांगितले. यावर मी म्हणाले, जोपर्यंत त्याचा श्वास आहे तोपर्यंत मी त्याला सोडून कुठेही जाणार नाही. 20 दिवसांनी दाखल झाल्यानंतर शौर्यच्या प्रकृतीत सुधारणा झाली. औषध चालू आहे, आता त्याला आराम मिळत आहे, असे शौर्यच्या आईने अधिक सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdoctorडॉक्टरInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी