शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१ कोटी, १ लाख, ५१ हजार १०१ रुपये अन् दागिने; एकुलत्या एक भाचीसाठी मामाकडून 'पैशांचा पाऊस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 17:16 IST

एकुलत्या एक भाचीच्या लग्नात तिच्या मामानं जे केलं ते सर्वजण पाहतच बसले.

मामा आणि भाचाचं, भाचीचं नातं काहीसं वेगळंच असतं. याचाच प्रत्यय देणारी अनोखी घटना हरयाणातून समोर आली आहे. खरं तर येथील रेवाडीमध्ये आपल्या एकुलत्या एक भाचीच्या लग्नात नवरीच्या मामानं जे केलं ते सर्वजण पाहतच बसले. सतबीर नावाच्या व्यक्तीनं त्याच्या भाचीच्या लग्नात कोट्यवधींचा वर्षाव केला. त्यानं भाचीला लग्नात १ कोटी, १ लाख, ५१ हजार १०१ रुपये रोखच दिले नाहीत तर कोट्यवधी रुपयांचे दागिनं देखील दिले आहेत. सध्या या लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. माहितीनुसार, नवरीचा मामा सतबीर याचा स्वतःचा क्रेनचा व्यवसाय आहे, सतबीर नेहमी त्याच्या विधवा बहिणीला मदत करत असतो. 

भाचीसाठी मामाकडून 'पैशांचा पाऊस'रेवाडी येथील असलवास हे सतबीरचं मूळ गाव. सतबीरच्या बहिणीचं लग्न सिंदरपूरमध्ये झालं होतं. पण तिच्या पतीचं निधन झाल्यानंतर त्याची बहीण पडैय्याजवळ वास्तव्यास गेली जी आजही तिथेच राहते. सतबीरच्या एकुलत्या एक बहिणीच्या पतीचे खूप पूर्वी निधन झालं होतं, त्याला एक भाची आहे. तिच्याच लग्नाच्या एका कार्यक्रमासाठी (शगुन विधी) सतबीर बहिणीच्या गावी गेला होता. सायंकाळी कार्यक्रमाला सुरूवात होणार होती... मात्र कार्यक्रमाला सुरूवात होताच सतबीरने नोटांचे बंडल काढताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले.

खरं तर सतबीरने बहिणीच्या घरी ५०० रुपयांच्या नोटांचा जणू काही पाऊसच पाडला. यावेळी एकूण एक कोटी, एक लाख, ५१ हजार १०१ रुपये रोख देण्यात आले. याशिवाय सतबीरने त्याची बहीण आणि भाचीला कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि इतर वस्तू देखील दिल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र त्याची चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :Haryanaहरयाणाmarriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल