शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना, अचानक खाण कोसळल्याने अनेक गावकरी अडकले, पाच जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 15:04 IST

छत्तीसगडमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे.

नवी दिल्लीछत्तीसगडमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. जगदलपूरपासून अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालगाव गावात अचानक खान कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 12 हून अधिक गावकरी अडकल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अजून बरेच लोक अडकले आहेत. अडकलेल्या गावकऱ्यांना वाचवण्यासाठी पोलीस आणि एसडीआरएफने बचावकार्य सुरू केले आहे. तर आतापर्यंत दोन गावकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

दरम्यान, घटनास्थळी अद्याप आणखी काही गावकरी अडकले असल्याचे सांगितले जात आहे. 7 पैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी 5 जण खाणीत अडकण्याची शक्यता आहे. 30 ते 40 मिनिटांत अडकलेल्या सर्व गावकऱ्यांना बाहेर काढले जाईल अशी माहिती आहे. 

मिझोराममध्येही खाण कोसळून 12 जणांचा झाला होता मृत्यू 14 नोव्हेंबर रोजी मिझोरामच्या हंथियाल जिल्ह्यात देखील खान कोसळून दुर्घटना घडली होती. खोदकाम सुरू असताना अनेक मोठे दगड वरून तुटून खाली पडले होते, त्यात 12 मजुरांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला होता. आसाम रायफल्स, बीएसएफ, स्थानिक पोलीस, एनडीआरएफ यांच्या पथकांनी बचाव कार्य केले मात्र या अपघातात अडकलेल्या सर्व मजुरांचा मृत्यू झाला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडDeathमृत्यूPoliceपोलिस