शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

वकिलाला कुत्रा चावला अन् कोर्ट झाले सावध... सरन्यायाधीश म्हणाले, लक्ष घालतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 11:53 IST

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात त्यांच्या हाताला जखम झाली होती. ही माहिती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना कळताच त्यांनी स्वत:हून संबंधित वकिलाची विचारपूस केली.

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात त्यांच्या हाताला जखम झाली होती. ही माहिती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना कळताच त्यांनी स्वत:हून संबंधित वकिलाची विचारपूस केली. यावेळी ते म्हणाले की, भटक्या कुत्र्यांच्या धोक्यासंदर्भात ते लक्ष देतील.

कायद्याच्या गुंतागुंतीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी ओळखले जाणारे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वकील कुणाल चॅटर्जी यांच्या हातावर असलेली पट्टी पाहिल्यावर त्यांनी याचे कारण विचारले. चॅटर्जी म्हणाले की, त्यांच्या शेजारच्या पाच भटक्या कुत्र्यांनी त्याला ‘पळवले’, ५ कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले.

यावर, ज्येष्ठ वकील विजय हंसरिया यांनी न्यायालयाला विनंती केली की, देशातील ‘भटक्या कुत्र्यांच्या समस्येची’ स्वतःहून दखल घ्यावी. यावेळी काय करता येईल का ते आम्ही पाहू, असे चंद्रचूड यांनी चॅटर्जीकडे लक्ष वेधून हंसरिया यांना म्हटले. चंद्रचूड यांनी तत्काळ चॅटर्जी यांना तुम्हाला काही वैद्यकीय मदतीची गरज आहे का? मी लगेच तुम्हाला अधिकाऱ्यांना घेऊन जाण्यास सांगतो. दोन वर्षांपूर्वी, माझा एक कर्मचारी कार पार्क करत होता. त्यावेळी  त्याच्यावरही रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांनी हल्ला केला होता, असे चंद्रचूड यांनी सांगितले.

वडिलांच्या मांडीवरच मुलाचा मृत्यू : सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उत्तर प्रदेशातील मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या व्हिडीओचा संदर्भ देत म्हटले की, या घटनेत एका मुलाचा भटक्या कुत्र्याने चावा घेतला. त्याला रेबीज झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात वडिलांच्या मांडीवरच मुलाचा तडफडून मृत्यू झाला. हा गंभीर धोका आहे. लोक याकडे फारसे लक्ष देत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयdogकुत्रा