शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 10:06 IST

Crime News: झटपट पैसे कमावण्याची चटक लागली की अनेकांचा तोल ढळतो. त्यामधून अनेक जण वाममार्गाला लागतात. दरम्यान तेलंगाणामधील हैदराबाद येथून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आर्थिक चणचणीमुळे त्रस्त असलेल्या एका जोडप्याने असं पाऊल उचललं, ज्याबाबत समजल्यावर पोलिसांनाही धक्का बसला.

झटपट पैसे कमावण्याची चटक लागली की अनेकांचा तोल ढळतो. त्यामधून अनेक जण वाममार्गाला लागतात. दरम्यान तेलंगाणामधील हैदराबाद येथून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आर्थिक चणचणीमुळे त्रस्त असलेल्या एका जोडप्याने असं पाऊल उचललं, ज्याबाबत समजल्यावर पोलिसांनाही धक्का बसला. झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी दोघेही गुन्हेगारीच्या मार्गाला लागले. पैसे कमावण्यासाठी या जोडप्याने जो मार्ग निवडला तो धक्कादायक होता आणि त्याचा शेवट आता पोलीस कोठडीत जाऊन झाला आहे.

हैदराबादमधील अंबरपेट परिसरातील मल्लिकार्जुननगर येथे राहणाऱ्या या जोडप्याने पैसे कमावण्यासाठी लाईव्ह सेक्स चॅट करण्याचा मार्ग निवडला. हे पती पत्नी याबदल्यात लोकांकडून दर पाच मिनिटांसाठी दोन हजार रुपये घ्यायचे. मात्र हळूहळू त्यांची पैशांची हाव एवढी वाढली की, या दोघांनीही व्हिडीओ तयार करून लोकांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

या आरोपी पती-पत्नीची ओळख नरेश आणि पल्लवी अशी पटली आहे. पोलिसांनी या जोडप्याला रंगेहात पकडले. त्यांच्या घरातून एचडी कॅमेरे, रेकॉर्डिंग डिव्हाईस आणि लाईव्ह स्ट्रिमिंग करणारी अनेक उपकरणे जप्त करण्यात आली.

पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी जोडप्याने पैशांची खूप गरज असल्याने आपण हे पाऊल उचलले असे सांगितले. नरेश हा ऑटो चालवायचा, मात्र तो बऱ्याच काळापासून आजारी होता. त्यामुळे त्याच्या तुटपुंज्या कमाईवर घर चालवणं कठीण बनलं होतं. तर या जोडप्याच्या दोन्ही मुली अभ्यासात खूप हुशार होत्या, त्यातील एक इंजिनियरिंगचं शिक्षण घेत आहे. तर दुसरीने बारावीमध्ये तब्बल ९९ टक्के गुण मिळवले आहेत. या मुलींच्या कॉलेजमधील फी आणि आपल्या औषधांचा खर्च भागवण्यासाठी या जोडप्याने हा मार्ग निवडला.

मोबाईल अॅपवर अशा गोष्टी केल्यास त्या माध्यमातून झटपट पैसे मिळू शकतात, असे या जोडप्याला वाटले. त्यामधून त्यांनी अश्लील चॅट आणि व्हिडीओंचा मार्ग निवडला. पोलिसांनी सांगितले की, आरोपी लाईव्ह व्हिडीओंसाठी दोन हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारत असत. तसेच त्यांच्याकडून रेकॉर्ड करण्यात आलेली क्लिप ५०० रुपयांना विकली जात असे. या अॅपवरील बहुतांस ग्राहक हे तरुण होते. तसेच हे जोडपं आपली ओळख लपवण्यासाठी मास्क परिधान करत असत.

आता पोलिसांनी या जोडप्याविरोधात आयटी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल केला आहे.  आरोपी नरेश आणि पल्लवी यांना कोर्टात हजर करण्यात आलं असून, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTelanganaतेलंगणा