शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

चोरून आलेले सरकार चोरीच करणार, राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 16:26 IST

... तरीही पंतप्रधान गप्पच का?

दत्ता पाटीलचिकोडी : कर्नाटकातील जनतेने पाच वर्षांपूर्वी काँग्रेसला जनादेश दिला होता. मात्र, घोडेबाजार करून आमदार विकत घेऊन चोरी करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने जनतेच्या पैशाची चोरी केली. चोरी करून आलेले सरकार चोरीच करणार. देशातील सर्वात भ्रष्ट भाजप सरकारला यावेळी जागा दाखवा, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. सदलगा (ता. चिक्कोडी) येथे काँग्रेसचे उमेदवार गणेश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.राहुल गांधी म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्या आल्या सरकारी सेवेत अडीच लाख नोकऱ्या, तर १० लाख युवकांना रोजगार देऊ. तसेच पदवीधर युवकांना दोन वर्षांसाठी ३ हजार रुपये बेकार भत्ता देऊ. लोककल्याणाचा ध्यास घेतलेल्या काँग्रेसला १५० हून अधिक जागा जिंकून देऊन बहुमतांनी सत्ता द्या. कर्नाटकाची जनता सुज्ञ असून, ती काँग्रेसला बहुमत देईल याची खात्री आहे, असा विश्वास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली.नोटबंदीमुळे कर्नाटकात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचा त्यांनी आरोप केला. प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये देण्याची पंतप्रधानांची घोषणा हवेतच विरली आहे. तसेच कर्नाटकातील भाजप सरकारने विकास कामांच्या निधीतील मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन चोरी केली आहे. आम्हाला सत्ता मिळाल्यास अशा भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि जनतेचा पैसा वाया जाणार नाही, असा विश्वासही गांधी यांनी व्यक्त केला.यावेळी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, महावीर मोहिते, सलीम अहंमद, महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, काँग्रेस नेते मोहन जोशी, वीरकुमार पाटील, अण्णासाहेब हवले, माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, बाळासाहेब पाटील, अरुण देसाई, रवी माळी, श्याम रेवडे, संतोष नवले, अनिल पाटील आदी उपस्थित होते.... तरीही पंतप्रधान गप्पच का?विकास कामातील ४० टक्के कमिशनबाबत कंत्राटदार संघटनेने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली आहे. सरकारच्या भ्रष्टाचारावर अनेकांनी जाहीर टीका केली. मात्र, अजूनही मोदींनी त्याची दखल घेतलेली नाही. यामागचे गौडबंगाल काय? असा सवालही राहुल गांधी यांनी केला.

भाजपचे कमिशन ५० टक्के होईल...कर्नाटकातील भाजप सरकार हे चोरी करणारे सरकार आहे. येथे ठेकेदारांकडून ४० टक्क्यांपर्यंत कमिशन घेतले जाते. त्यामुळे जर अशा मंडळींच्या हातात पुन्हा सत्ता गेली, तर भविष्यात या कमिशनच्या मागणीत ५० टक्क्यांपर्यंत वाढ होऊन विकासाला खीळ बसेल, अशी भीतीही गांधी यांनी व्यक्त केली.

...तर घरकुलाचे अनुदान वाढवूवाढत्या महागाईने घर बांधणीच्या साहित्याच्या दरातही तिपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे घरकुल योजनेच्या लाभार्थींना दीडऐवजी ५ लाख अनुदान करावे, या प्रकाश हुक्केरी यांच्या मागणीचा संदर्भ देत आपली सत्ता आली तर वाढीव अनुदानाच्या मागणीचीही निश्चित पूर्तता करू, अशी ग्वाहीही राहुल गांधी यांनी दिली.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा