शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रातून वाहत आला चक्क सोनेरी रथ! आंध्र प्रदेशमध्ये सारेच चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 06:43 IST

अमरावती : ‘असनी’ चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली गावात आश्चर्यकारक प्रकार उघडकीस आला. ...

अमरावती : ‘असनी’ चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली गावात आश्चर्यकारक प्रकार उघडकीस आला. चक्क एक सोनेरी रथच या गावातील किनारपट्टीला थडकला आहे. हा रथ पाहण्यासाठी केवळ सुन्नापल्लीतीलच नव्हे तर पंचक्रोशीतील कैक ग्रामस्थांनी गर्दी केली होती. 

सुन्नापल्लीच्या ग्रामस्थांची मंगळवारची सकाळ आश्चर्याची ठरली. काहींना समुद्रातून चक्क एक सोनेरी रथ वाहून येत असल्याचे दिसले. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. किनाऱ्यावर गर्दी जमली. मोठे दोरखंड आणून हा सोनेरी रथ किनाऱ्यावर आणण्यात आला. रथ सोन्याचा असावा, असा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केल्याने गोंधळात भर पडली. दरम्यान, या प्रकाराची माहिती जिल्हा प्रशासनासह पोलिसांनाही देण्यात आली. पोलिसांनीही किनाऱ्याकडे धाव घेत रथ ताब्यात घेतला.  (वृत्तसंस्था)

थायलंड की म्यानमारमधील?n सोनेरी रथाबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. स्थानिकांच्या मते हा रथ चक्रीवादळामुळे समुद्रात निर्माण झालेल्या मोठ्या लाटांवर स्वार होत थायलंड किंवा म्यानमारमधून आला असावा. n इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया किंवा म्यानमार या देशांतील समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या मठातून हा रथ वाहत आला असावा, असे काहींचे मत आहे. भारतातच पूर्व किनारपट्टीवर एखाद्या चित्रीकरण स्थळावरून बंगालच्या उपसागरातून हा रथ वाहून आला असावा, असा काहींचा कयास आहे.  

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश