शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

नेदरलँड्सहून आले 'वऱ्हाड'! परदेशी तरूणी आणि भारतीय तरूणाचं लग्न; पोलिसांचीही हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 13:02 IST

नवरदेव हार्दिक हा नेदरलँड्समधील एका औषध कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे.

प्रेमाला कोणती सीमा नसते असे नेहमी बोललं जातं. प्रेमात पडलेली मंडळी आपले प्रेम मिळवण्यासाठी कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही... याचाच प्रत्यय देणारी घटना उत्तर प्रदेशातील फतेहरपूर येथून समोर आली आहे. खरं तर इथे एक तरुणी सातासमुद्रापार जाऊन उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात प्रियकरापर्यंत पोहोचली. बुधवारी दोघांचा कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला. परदेशी तरुणी आणि स्थानिक तरुणाची ही प्रेमकहाणी संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. नेदरलँड्समधून आलेल्या या तरूणीचे आणि स्थानिक हार्दिकचे प्रेमसंबंध होते. तीन वर्षांपूर्वी त्या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. यानंतर दोघांनीही आपापल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, परदेशी तरुणी आल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच पोलिसांनी तरुणाच्या घरी पोहोचून इतर कागदपत्रांसह तरुणीचा पासपोर्ट तपासला. हार्दिक हा नेदरलँड्समधील एका औषध कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. हार्दिकचे वडील राधेलाल वर्मा हे जवळपास चार दशकांपासून गुजरातमधील गांधीनगर शहरात राहत आहेत. तिथल्या एका खासगी कंपनीत ते नोकरीवर आहेत. त्यांना निशांत वर्मा आणि हार्दिक वर्मा (३२) अशी दोन मुले आहेत. हार्दिक ८ वर्षांपासून नेदरलँड्समधील एका फार्मास्युटिकल कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे.

नेदरलँड्सहून आले 'वऱ्हाड'नेदरलँड्समध्ये नोकरी करत असताना तीन वर्षांपूर्वी हार्दिकची भेट त्याच कंपनीत काम करणाऱ्या ब्रिएला डुडा या २० वर्षीय तरूणीशी मैत्री झाली. हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढत गेली आणि जवळपास दोन वर्षे ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. हार्दिक आणि गॅब्रिएला यांनी त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिल्यावर कुटुंबीय लग्नासाठी तयार झाले. लग्नासाठी घरच्यांचा होकार मिळाल्यानंतर १५ दिवसांपूर्वी हार्दिक आणि त्याची परदेशी मैत्रीण गॅब्रिएला भारतात आले. यानंतर हार्दिक त्याच्या होणाऱ्या पत्नीला गांधीनगर येथील त्याच्या घरी घेऊन गेला होता. हार्दिकच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत तिथे साखरपुडा पार पडला. 

घरच्यांच्या संमतीने लागले लग्नस्थानिक पोलिसांनी सांगितले की, परदेशी तरुणी आणि तरुणाच्या लग्नाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले आणि दोघांचे पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे तपासली. दोघांनीही घरच्यांच्या संमतीने लग्न केले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न