शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ निर्णयांत कोर्ट दुरुस्ती करू शकते?; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 00:33 IST

सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या पीठाने २३ जानेवारी रोजी हा वादग्रस्त मुद्दा मोठ्या पीठाकडे सोपवला

नवी दिल्ली : न्यायालये मध्यस्थता व समेटशी संबंधित वर्ष १९९६च्या कायद्याच्या तरतुदीनुसार मध्यस्थतेशी संबंधित निर्णयांत दुरुस्ती करू शकतात का, या महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या पीठाने गुरुवारी सुनावणी सुरू केली.

सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्या. बी. आर. गवई, न्या. संजय कुमार, न्या. के. व्ही. विश्वनाथन आणि न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांचे एक घटनापीठ सध्या केंद्राच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचे म्हणणे ऐकत आहे. मध्यस्थता आणि समेट अधिनियम १९९६ अंतर्गत वादाच्या निपटाऱ्यासाठी एक वैकल्पिक पद्धत मध्यस्थता आहे आणि हे न्यायाधीकरणांनी दिलेल्या निर्णयांत न्यायालयांचा हस्तक्षेप करण्याच्या भूमिकेस कमी करतो. अधिनियमाचे कलम ३४ प्रक्रियात्मक अनियमितता, सार्वजनिक धोरणांचे उल्लंघन किंवा अधिकार क्षेत्राची कमी यासारख्या सीमित आधारावर मध्यस्थतेशी संबंधित निर्णय रद्द करण्याची तरतूद ठेवते.

प्रकरण मोठ्या पीठाकडेकलम ३७ मध्यस्थतेशी संबंधित आदेशांच्या विरोधात अपील नियंत्रित करते. यात निर्णय रद्द करण्यास इन्कार करण्याचा आदेशही समाविष्ट आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या पीठाने २३ जानेवारी रोजी हा वादग्रस्त मुद्दा मोठ्या पीठाकडे सोपवला. पीठाने म्हटले की, सर्वप्रथम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक विरुद्ध एम. हकीम प्रकरणात दिलेल्या त्या कारणावर फेरविचार करण्याची मागणी करणाऱ्या वकिलांचा युक्तिवाद ऐकणार आहोत, ज्यात न्यायालयाकडे मध्यस्थता व समेट अधिनियमानुसार  निर्णयात दुरुस्तीचा अधिकार आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय