शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

राम अवतरले; स्वप्न साकारले; सायंकाळी रामज्योतीने उजळून निघाला देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 07:13 IST

लाखो रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले. याच सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग औत्सुक्याने वाट पाहत होते.

अयोध्या : रामनामाचा गजर... सनई चौघड्यांसह ५० वाद्यांचा निनादणारा मंगलध्वनी... पुरोहितांचे भारावून टाकणारे वैदिक मंत्रोच्चार अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात रामलल्लांच्या मूर्तीची अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि संपूर्ण देशभरात जय श्रीरामचा जयघोष गुंजला... पौष शुक्ल द्वादशीला दुपारी ठीक १२ वाजून २९ मिनिटे व ८ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिटे व ३२ सेकंदांपर्यंतच्या अभिजित शुभमुहूर्तावर रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. लाखो रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले. याच सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग औत्सुक्याने वाट पाहत होते.

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मंदिर परिसरात सकाळपासूनच लगबग सुरू झाली. दहा वाजल्यापासून निमंत्रित मान्यवर पाहुण्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली. मुख्य सोहळ्यापूर्वी देशातील विविध राज्यांतून आलेल्या पारंपरिक वाद्यांचे वादन आणि प्रख्यात गायक शंकर महादेवन, सोनू निगम आदींच्या सादरीकरणाने मंगलध्वनी सोहळा पार पडला. त्यानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांचे मंदिर परिसरात आगमन झाले. लाल रंगातील वस्त्रात चांदीचे छत्र घेऊन मंदिराच्या मुख्यद्वारापासून चालत जात पंतप्रधान मोदींनी गर्भगृहात प्रवेश केला. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १२:२० वाजता मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठेच्या विधींना प्रारंभ झाला. प्राणप्रतिष्ठा पूजेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्लांच्या मूर्तीला कमलपुष्प अर्पण केले. रामलल्लांच्या देखण्या मूर्तीचे दर्शन होताच  'जय श्रीराम'चा जयघोष झाला. सायंकाळी प्रज्वलित रामज्योतीने  अवघा देश उजळला.

११ दिवसांचे अनुष्ठान पूर्ण :  

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी ११ दिवसांचे अनुष्ठान ठेवले होते. सोमवारी या सोहळ्यासाठी गर्भगृहात आल्यावर मुख्य पूजेपूर्वी अकराव्या दिवसाचे विधी, पूजन व संकल्प केला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर स्वामी गोविंददेव महाराज यांच्या हस्ते चरणामृत ग्रहण करत अनुष्ठान पूर्ण केले.

शिवमंदिरात पूजा, जटायू मूर्तीचे अनावरण :

पंतप्रधान मोदी यांनी मंदिर परिसरातील कुबेर टिळा येथील शिव मंदिरातही पूजा केली व जटायू मूर्तीचे अनावरण केले. त्यानंतर राम मंदिराच्या निर्माण कार्यात सहभागी श्रमिकांवर पुष्पवर्षाव केला.

कशी आहे रामलल्लांची नवी मूर्ती?

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि रामलल्लांच्या देखण्या मूर्तीने सर्वांच्याच डोळ्याचे पारणे फिटले. भाळी तिलक असलेल्या आणि दागिने व भरजरी वस्त्रांनी नटलेल्या आणि अतिशय सौम्य भावमुद्रेतील रामलल्लांच्या मूर्तीचे सौंदर्य मोहित करणारे असेच आहे.  कमळाच्या फुलावर विराजमान रामलल्लांची मूर्ती ४.२४ फूट उंच, ३ फूट रुंद व २०० किलोची आहे.  nकृष्ण शैलीत तयार केलेली ही मूर्ती हजारो वर्षे जुन्या श्यामल शिळेतून घडविण्यात आली. 

रत्नजडित मुकुट

मूर्तीभोवती आभामंडळ असून मूर्तीवर स्वस्तिक, ओम, चक्र, गदा आणि सूर्यदेव कोरलेली आहेत. देखणे आणि तितकेच विलोभनीय डोळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. उजवा हात आशीर्वादाच्या मुद्रेत, तर डाव्या हातात धनुष्यबाण आहे. मूर्तीच्या खाली एका बाजूला हनुमान आणि दुसऱ्या बाजूला गरुड कोरलेले आहेत. मूर्तीवर सुमारे पाच किलोचे रत्नजडित मुकुट असून त्यावर वेगवेगळी रत्न मढवलेली आहे. मूर्तीवरील दागिने रत्न, माणिक, मोती व हिऱ्यांपासून तयार केले आहेत.

असा पार पडला प्राणप्रतिष्ठा सोहळा

११.५५ वाजता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हातात चांदीची छत्री आणि रामलल्लांचे वस्त्र घेऊन आगमन झाले. १२.१० वाजता : मुख्य आचार्यांनी प्रथम शुद्धीकरण केले. हातात पाणी घेऊन पूजन व प्राणप्रतिष्ठा करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. १२.२० वाजता : प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला सुरुवात. सुरुवातीला गणपतीची पूजा झाली. १२.२५ वाजता : रामलल्लांच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी मूर्तीच्या चरणी कमळाची फुले अर्पण केली.१२.२९ ते १२.३१ वाजता : कमळाच्या फुलाने मूर्तीवर पाणी शिंपडून अभिषेक विधी पूर्ण केला. रामलल्लांच्या मूर्तीला विविध पूजेचे साहित्य अर्पण करण्यात आले.१२.३५ वाजता : पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्लांची आरती झाली.१२.५५ वाजता : रामलल्लांच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालून मोदींनी साष्टांग नमस्कार घातला. नंतर ते गर्भगृहातून बाहेर पडले.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत