शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद कंटेनरचालकाने कारला ठोकरले, अनेक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले, त्यानंतर…

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 11:27 IST

Uttar Pradesh News: तुम्ही चित्रपटांमध्ये खूप स्टंट्स पाहिले असतील. मात्र अशाच फिल्मी स्टाईलमध्ये एका कारला कंटेनरचालकान फरफटत नेल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

तुम्ही चित्रपटांमध्ये खूप स्टंट्स पाहिले असतील. मात्र अशाच फिल्मी स्टाईलमध्ये एका कारला कंटेनरचालकान फरफटत नेल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील आहे. येथे एका मद्यधुंद कंटेनरचालकाने कारला धडक देऊन काही किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. रस्त्यावरील लोकांनी आरडाओरडा करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. मेरठमधील घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

मात्र एवढा भीषण अपघात होऊनही सुदैवाने कारमधील चार तरुण बचावले. सर्वांनी कसेबसे आपले प्राण वाचवले. दरम्यान, या मद्यधुंद ड्रायव्हरचं कृत्य रस्त्यावरील लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपलं आहे. तसेच ते सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे.  

दरम्यान, या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून, तपासाला सुरुवात केली आहे. तसेच आरोपी ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले आहे. आता त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी दोषी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.  सदर कंटेनरचालक कारला फरफटत नेत होता. अखेर एका पोलीस कर्मचाऱ्याना हिंमत करून हा कंटेनर अडवला आणि चालकाला ताब्यात घेतले. पकडण्यात आले तेव्हा हा ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत होता. 

हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील परतापूर ठाणे परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारादरम्यान कारमधून प्रवास करत असलेल्या तरुणांचे प्राण संकटात सापडले होते. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत आपले प्राण वाचवले. दरम्यान, पोलिसांनी सदर कंटेनर चालकाला ताब्यात घेतले.  

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश