शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मालकाला पाहताच पोपट म्हणाला, "मम्मी-पप्पा"; पोलिसांनी काही क्षणात निर्णय देऊन टाकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 21:54 IST

उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक वेगळचं प्रकरण समोर आले आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक वेगळचं प्रकरण समोर आले आहे. पोलीस ठाण्यात परदेशी पोपटाच्या मालकीवरून दोन पक्षांमध्ये पंचायत झाली. तासभर चाललेल्या या पंचायतीनंतर पोलिसांनी निकाल देत परदेशी जातीचा पोपट कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. यानंतर त्या कुटुंबाच्या मोठ्या प्रमाणात आनंद झाला.

सदर दोन कुटुंबीयांनी कमला नगर पोलीस ठाण्यातील बाळकेश्वर पोलीस ठाणे गाठले. एका कुटुंबाच्या हातात एक पिंजरा असलेला पोपट होता, जो वारंवार मम्मी आणि पप्पा म्हणत होता. पोलिसांना हे प्रकरण समजण्यापूर्वीच दोन्ही कुटुंबांनी पोपटावर आपली मालकी सांगण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप करत स्वत:ला पोपटाचे मालक म्हणवून घेतले. 

सदर प्रकरणावर पोलिसांनी चौकशी सुरू केली असता चार वर्षांपूर्वी बाळकेश्वर येथे राहणाऱ्या कुटुंबाने दुसऱ्या पक्षाकडून परदेशी जातीचा पोपट खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. ४ वर्षांपासून हे कुटुंब पोपटाची काळजी घेत होते. पोपटही त्या कुटुंबात मिसळून मालकाला मम्मी-पप्पा म्हणून हाक मारत होता. एका बाजूची संपूर्ण कहाणी ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या बाजूने पोपटाच्या मालकीची कागदपत्रे मागितली. पण, ते कुटुंब पुरावा म्हणून पोलिसांसमोर काहीही ठेवू शकले नाही. यानंतर पोलिसांनी पोपटाची काळजी घेत कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी हा निर्णय जाहीर करताच कुटुंबीय पोपटाला सोबत घेऊन गेले. पोपटाच्या मालकी हक्काचा हा वाद चर्चेचा विषय राहिला आहे. या पोपटाची इतर पक्षाला चांगलीच किंमत मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे त्याच्या मनात लोभ येऊन पोपट परत मिळवण्यासाठी तक्रार घेऊन तो पोलीस ठाण्यात आला होता, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस