शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकशाही देशाने ‘पोलिस राज’प्रमाणे काम करता कामा नये’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 07:57 IST

न्या. अभय एस. ओक व न्या. उज्ज्वल भुइंया यांच्या पीठाने मंगळवारी म्हटले की, जेथे तपास यंत्रणा कोणत्याही वास्तविक कारणाशिवाय लोकांना ताब्यात घेण्यासाठी मनमानी शक्तींचा वापर करतात, त्या लोकशाही देशाने ‘पोलिस राज’प्रमाणे काम करता कामा नये.

नवी दिल्ली : चौकशी पूर्ण झाल्यानंतरही कनिष्ठ न्यायालयांकडून कमी गंभीर प्रकरणांमध्ये जामीन याचिका फेटाळण्यात येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 

न्या. अभय एस. ओक व न्या. उज्ज्वल भुइंया यांच्या पीठाने मंगळवारी म्हटले की, जेथे तपास यंत्रणा कोणत्याही वास्तविक कारणाशिवाय लोकांना ताब्यात घेण्यासाठी मनमानी शक्तींचा वापर करतात, त्या लोकशाही देशाने ‘पोलिस राज’प्रमाणे काम करता कामा नये.  पीठाने म्हटले आहे की, दोन दशकांपूर्वी छोट्या प्रकरणातील जामीन याचिका उच्च न्यायालयांत फारच कमी पोहोचत असत. सर्वोच्च न्यायालयाची तर बातच सोडा.

या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. कनिष्ठ न्यायालये व उच्च न्यायालयांनी जामीन देताना अधिक उदार दृष्टिकोन अवलंबावा, असा आग्रह न्यायालयाने वारंवार धरलेला आहे.

पीठाने एका आरोपीला जामीन दिला. फसवणुकीच्या एका प्रकरणात दोन वर्षांपासून तो ताब्यात होता. चौकशी पूर्ण झाली आणि आरोपपत्र दाखल झाले तरी आरोपीची जामीन याचिका कनिष्ठ न्यायालय व गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली होती. 

आमच्यावर ओझे कशाला टाकता? जामीन याचिकेवर सुनावणी करताना न्या. ओक यांनी म्हटले की, ज्या याचिकांचा निपटारा कनिष्ठ न्यायालयांत व्हायला पाहिजे, त्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करीत आहे, ही आश्चर्यकारक बाब आहे. 

न्यायपालिकेवर अनावश्यकरीत्या ओझे टाकले जात आहे. जामीन निष्पक्ष आणि वेळेवर दिला जावा, यासह स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा आग्रहही न्यायालयाने धरला आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय