वाढता हार्ट अटॅकचा धोका अन् कोविड लसीकरण यांचं कनेक्शन?; ICMR करणार रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 05:01 PM2023-06-20T17:01:58+5:302023-06-20T17:03:03+5:30

लोकांच्या मनात पडलेल्या प्रश्नांवर आता ICMR एक स्टडी करत आहे. या स्टडीचा सुरुवातीचा रिपोर्ट येत्या जुलै २०२३ मध्ये प्रकाशित करण्यात येईल

A Connection Between Increased Heart Attack Risk and Covid Vaccination?; Research will be done by ICMR | वाढता हार्ट अटॅकचा धोका अन् कोविड लसीकरण यांचं कनेक्शन?; ICMR करणार रिसर्च

वाढता हार्ट अटॅकचा धोका अन् कोविड लसीकरण यांचं कनेक्शन?; ICMR करणार रिसर्च

googlenewsNext

नवी दिल्ली - २०१९ मध्ये कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव चीनच्या वुहान शहरात पाहायला मिळाला. त्यानंतर हळूहळू या व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला. २०२० मध्ये भारतातील परिस्थिती पाहून लॉकडाऊन लावावे लागले. त्यानंतर कोरोनाशी लढण्यासाठी लस बनवण्यात आली. अनेक देशांनी लसी विकसित केल्या. भारतानेही २ कोरोना लसी बनवल्या. २०२१ मध्ये भारतात लोकांचे कोविड लसीकरण होण्यास सुरुवात झाली. त्याचसोबत गेल्या २ वर्षात हार्ट अटॅकच्या प्रकारांमध्येही अचानक वाढ झाल्याचे दिसून येते. 

एप्रिल २०२१ मध्ये जेव्हा भारतात कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे हाहाकार माजला होता. तेव्हा लोकांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली. या काळात कोरोनामुळे अनेक लोकांचे जीव गेले. काहींचा कोरोनामुळे तर काहीजणांना अन्य आजारामुळे मृत्यू झाला. परंतु आता असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय की, कोरोना व्हायरल रोखण्यासाठी जी लस तयार करण्यात आली होती त्यामुळे लोकांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे. 

ICMR करतंय रिसर्च
लोकांच्या मनात पडलेल्या प्रश्नांवर आता ICMR एक स्टडी करत आहे. या स्टडीचा सुरुवातीचा रिपोर्ट येत्या जुलै २०२३ मध्ये प्रकाशित करण्यात येईल. या रिसर्चमध्ये आयसीएमआर भारतातील युवा लोकसंख्येला कोविड लसीकरण आणि वाढत्या हृदयविकाराच्या घटना यात काही संबंध आहे का याचा शोध घेणार आहे. या स्टडीचा सुरुवातीचा रिपोर्ट काही काळापासून पेंडिग आहे. हा प्रकाशित करण्याआधी ICMR आतापर्यंत निष्कर्षावर चर्चा करत आहे. ICMR रिपोर्टबाबत अतिशय गंभीरपणे अभ्यास करतंय. जोपर्यंत संपूर्ण खातरजमा केली जात नाही तोपर्यंत हा रिपोर्ट सार्वजनिक करण्यात येणार नाही. 

'या' ३ प्रश्नांची उत्तरे शोधणार
हृदयविकारामुळे अचानक होणारे मृत्यू आणि कोविड लसीकरण यांच्या संबंधाबाबत रिसर्च करण्यासाठी आयसीएमआर काही प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. 
१) लोकांचा मृत्यू लसीकरणानंतर नैसर्गिक कारणामुळे झालाय का?
२) कोविड रोखण्यासाठी बनवण्यात आलेली लस मृत्यूसाठी जबाबदार आहे का?
३) मृत्यू होणारा व्यक्तीला कोविडचा गंभीर आजार होता की, दिर्घकाळ तो कोरोनामुळे पीडित होता का?

४० हॉस्पिटलमधून मागवला डेटा 
या स्टडीच्या रिसर्चसाठी ICMR ने ४० हॉस्पिटलमधील क्लिनिकल रजिस्ट्रेशनची माहिती घेतली. यातील अनेक रुग्णांचा डेटा AIIMS मधूनही घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १४ हजार रुग्णांच्या नमुन्यापैकी ६०० लोकांच्या मृत्यूची माहिती मिळाली. मार्च महिन्यात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, कोरोनानंतर हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यावर चर्चा सुरू आहे आणि ICMR याबाबत स्टडी करत आहे. लसीकरणाचे आकडे आमच्याकडे आहेत. ICMR मागील ३-४ महिन्यांपासून यावर अभ्यास करत आहे. हा रिपोर्ट ६ महिन्यात येणार होता. परंतु जुलै महिन्यापर्यंत हा रिपोर्ट सार्वजनिक केला जाईल असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते. 

इंडियन हार्ट असोसिएशननुसार, मागील वर्षात ५० वयापेक्षा कमी ५० टक्के आणि ४० वयापेक्षा कमी २५ टक्के लोकांना हार्ट अटॅकचा धोका पाहायला मिळाला. तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त हृदयासंबंधित आजाराने ग्रस्त आहेत. हृदयाच्या आजारासाठी ब्लड प्रेशर, तणाव, शुगर, अनियमित जीवनशैली हे मोठे कारण आहे. 

Web Title: A Connection Between Increased Heart Attack Risk and Covid Vaccination?; Research will be done by ICMR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.