शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

अवैध विवाहातून जन्माला आलेल्या मुलालाही मिळणार वडिलांची संपत्ती, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 14:38 IST

orissa high court ruling says kids from void marriage can inherit fathers property

आपल्या सभोवताली अनेक वेळा संपत्तीवरून होणारे कौटुंबिक वाद समोर येत असतात. अशा घटना अनेक वेळा न्यायालयापर्यंतही पोहोचतात. यात अनेक वेळा बहुविवाहाचे प्रकरण समोर येते. अशाच एका प्रकरणात ओडिशा उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. "जर एखाद्याचा दुसरा विवाह अवैध घोषित केला असला तरीही, त्या विवाहातून जन्माला आलेल्या मुलांना पित्याच्या संपत्तीत संपूर्ण अधिकार मिळेल. यात केवळ स्वतः अर्जित केलेल्या मालमत्तेचाच नाही, तर वडिलोपार्जित मालमत्तेचाही समावेश असेल," असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने हा निर्णय हिंदू विवाह कायदा आणि हिंदू उत्तराधिकार कायद्यातील तरतुदीनुसार दिला आहे. 

याचिका फेटाळली -खरे तर हे प्रकरण एका ८० वर्षांच्या महिलेच्या याचिकेशीसंबंधित आहे. या वृद्ध महिलेने आपल्या दिवंगत पतीच्या, दुसऱ्या पत्नीच्या मुलांना मालमत्तेपासून दूर ठेवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, केवळ आपणच मृत व्यक्तीची कायदेशीर पत्नी आहोत, यामुळे केवळ आपल्याच मुलांना मालमत्तेचा अधिकार मिळावा, असा दावा या महिलेने केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने या महिलेची याचिका फेटाळून लावली.

कायद्यांदर्गत 'क्लास-1 वारस' -यासंदर्भात निकाल देताना न्यायालय म्हटले, "हिंदू विवाह कायद्याच्या कलम १६ अंतर्गत, अवैध रद्दबातल आणि वादग्रस्त रद्दबातल विवाहांमधून जन्मलेली मुले देखील कायदेशीररित्या वैध मानली जातात. अशा मुलांना हिंदू वारसाहक्क कायद्यांतर्गत 'क्लास-1 वारस' अथवा 'वर्ग-१ वारस' मानले जाईल. तसेच, त्यांना त्यांच्या पालकांच्या मालमत्तेत संपूर्ण हक्क मिळतील.

तत्पूर्वी, ऑक्टोबर २०२१ मध्ये, कौटुंबिक न्यायालयाने ८० वर्षीय महिलेला मृताची कायदेशीर पत्नी आणि वारस मानून मालमत्तेत अधिकार दिला होता. मृताच्या दुसऱ्या पत्नीने याविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, आपल्याला आपली बाजू मांडण्याचा संपूर्ण अधिकार दिला नाही, असे म्हटले होते. यानंतर उच्च न्यायालयाने सुनावणी करताना स्पष्ट केले की, दुसऱ्या विवाहापासून जन्माला आलेल्या मुलांना संपत्तीपासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही. मग भलेही तो विवाह वैध नसेल... संबंधित मुलांचा त्यांच्या पित्याच्या संपत्तीत कायदेशीर हक्क राहील. महत्वाचे म्हणजे, हा निर्मय भविष्यात, असे अनेक वाद संपवण्याच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmarriageलग्नhusband and wifeपती- जोडीदार