शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला पळवून नेताना प्रियकराचा जागीच मृत्यू; जखमी तरूणीने सांगितला घटनेचा थरार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 17:39 IST

छत्तीसगडमधील कोंडागाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Boyfriend running away with girlfriend । कोंडागाव : छत्तीसगडमधील कोंडागाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे कोंडागाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला बाईकने  धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेली तरूणी गंभीर जखमी झाली आहे. संबंधित तरूणीला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. खरं तर मृत तरूण आणि दुखापतग्रस्त तरूणी हे प्रेमी युगुल असल्याचे सांगितले जात आहे.

प्रियकराचा जागीच मृत्यू माहितीनुसार, कोंडागाव येथील बनियागाव येथील नीलम पोयाम (24) ही तरूणी गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी कोंडागाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे उपचारादरम्यान नीलम पोयाम हिने पलारी गावातील राजकुमार यादव (21) या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती दिली. काल रात्री राजकुमार यादव हा पलारी गावातून नीलम पोयाम हिला घेण्यासाठी दुचाकीवरून बनियागाव येथे आला होता. तेथून दोघेही दुचाकीने पलारी गावाकडे निघाले असता राष्ट्रीय महामार्ग 30 वर उभ्या असलेल्या ट्रकची आणि दुचाकीची धडक झाली. या धडकेत 21 वर्षीय राजकुमार यादव हा जागीच ठार झाला.  

जखमी तरूणी नीलम पोयाल हिने दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार तिला त्याच्यासोबत घेऊन जाण्यासाठी आला होता. तसेच घरातील सदस्यांच्या नकळत ती त्याच्यासोबत घरातून पळून जात असता हा अपघात झाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडAccidentअपघातLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यू